
Honey Chilli Potatoes : रोज रोज डाळ भात भाजी चपाती खाऊन देखील कंटाळ येतो. अशात तुम्ही घरच्या घरी काही चटपटीत पदार्थ तयार करु शकता. बटाटा सर्वांना अवडतो म्हणून तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईलने हनी चिली पोटॅटो तयार करु शकता. चिली पोटॅटो बनवण्यासाठी तुम्हाला बटाटे, कॉर्नफ्लोअर, तेल, तीळ, सोया सॉस, कुस्करलेल्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, धणे, शिमला मिरची, हिरव्या मिरच्या, आले, टोमॅटो चटणी, लाल मिरची सॉस इत्यादींची आवश्यकता भासेल.
त्यानंतर हनी चिली पोटॅटो हे एक लोकप्रिय चायनीज स्टार्टर आहे. अनेकांना हा पदार्थ आवडतो. हनी चिली पोटॅटो बटाटे, ढोबळी मिरची, सोया सॉस, मिरची सॉस आणि मध वापरून बनवलं जातं. हा पदार्थ गोडसर, झणझणीत आणि कुरकुरीत असतो. याला बनवण्यासाठी बटाटे तळले जातात आणि मग मध आणि इतर मिरचीच्या सॉसमध्ये परतले जातात.
हनी चिली बटाटे बनवण्यासाठी, प्रथम बटाटे चांगले धुवा आणि सोलून घ्या. आता एका भांड्यात पाणी भरा आणि बटाट्याचे लांब तुकडे करा. त्यानंतर सर्व बटाटे कापल्यानंतर, ते पिळून एका भांड्यात ठेवा. नंतर कॉर्न फ्लोअर घाला आणि हाताने चांगले मिसळा.
गॅसवर एक पॅन ठेवा आणि तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेले बटाटे घाला आणि ते तळा. ते हलके सोनेरी तपकिरी झाल्यावर ते प्लेटमध्ये काढा. ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमचे बटाटे तयार झाले आहेत का… हे एकदा निट पाहा…
बटाटे तयार झाल्यानंतर, गॅसवर एक पॅन ठेवा. त्यात 2 टेबलस्पून तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात 1 टेबलस्पून तीळ घाला. तीळ काही सेकंदात भाजतील. नंतर, अर्धा कप हिरव्या मिरच्या घाला आणि मध्यम आचेवर शिजवा.
नंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 2 चमचे टोमॅटो सॉस, 1 चमचा लाल मिरची सॉस, 1 चमचा सोया सॉस, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा व्हिनेगर घाला आणि मंद आचेवर चांगले शिजवा. त्यानंतर, गॅस बंद करा आणि मिश्रणावर 2 चमचे मध घाला. तळलेले बटाटे घाला आणि चांगले मिसळा. तुमचे हनी चिली बटाटे तयार आहेत.