रीठ्यापासून घरच्या घरी बनवा शॅम्पू, पांढरे केस कोंडा आणि केसगळती होईल कमी
रीठा केवळ एक नैसर्गिक क्लीन्झरच नाही, तर केस पांढरे होणे, कोंडा आणि केसगळती यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही रीठ्यापासून घरी सहजपणे शॅम्पू बनवू शकता. कसे ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

आजकाल केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या या निर्माण होत असतात. तर बहुतेकजण केसांच्या समस्या कमी करण्यासाठी आता महागडे हेअर प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरगूती नैसर्गिक उपाय करण्याकडे अधिक भर दिला जात आहे. तर यावर नैसर्गिक उपायांबद्दल पाहिले तर आयुर्वेदात शतकानुशतके केस आणि हेअर केअरसाठी रीठाचा वापर केला जात आहे. रीठ्यामध्ये त्याच्या फळात नैसर्गिक फेस निर्माण करणारे घटक (सॅपोनिन्स) असतात, ज्यामुळे ते एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लीन्झर ठरते. तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की रीठाच्या वापराने केसांसाठी होणारे फायदे आणि रीठ्यापासून घरच्या घरी शॅम्पू कसा बनवायचा.
रीठ्याचा वापर
आजकाल बाजारात प्रत्येक हेअर केअर प्रोडक्टमध्ये केमिकल हे असते. या हेअर प्रोडक्टचा वापर केल्याने कालांतराने केसांची समस्या पुन्हा निर्माण होते आणि केसांचे नुकसान देखील होते. तर अशावेळेस रीठा हा एक नैसर्गिक पर्याय आहे जो कोणत्याही दुष्परिणामांशिवाय केस स्वच्छ करण्यास आणि त्यांची काळजी घेण्यास मदत करतो. बरऱ्याच वर्षापासून अनेक लोकं केस धुण्यासाठी रीठा वापरत असत. तो पाण्यात भिजवून किंवा उकळून ते त्या पाण्याने केस धुवत असत, ज्यामुळे केस स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसायचे.
केसांसाठी रीठाचे फायदे
रीठाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तो केसांमधील नैसर्गिक ओलावा काढून न टाकता त्यांना मुळांपासून स्वच्छ करतो. तसेच स्कॅल्पचे आरोग्य सुधारते आणि कोंड्यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. ज्यांना स्कॅल्पला खाज सुटण्याचा किंवा जळजळ होण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी रीठा खूप फायदेशीर मानला जातो.
रीठा केसांना मजबूत करण्यासही मदत करतो. त्याच्या नियमित वापरामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ सुधारते. तसेच यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते, ज्यामुळे केस अधिक निरोगी आणि स्वच्छ दिसतात.
केसांसाठी घरच्या घरी रीठाचा वापर कसा करावा?
केसांसाठी रीठा वापरायलाही खूप सोपा आहे. रीठा हा बाजारात सहजपणे मिळतो. काही प्रमाणात रीठा घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा किंवा हलके पाण्यात उकळवून घ्या. नंतर हे पाणी गाळून शॅम्पू म्हणून वापरले जाते. काही लोकं या शॅम्पूमध्ये आवळा आणि शिकेकाई यांचा वापर करतात, ज्यामुळे त्याचा प्रभाव वाढतो.
रीठाचा वापर केवळ केसांसाठीच नाही, तर कपडे धुण्यासाठी आणि घरगुती स्वच्छतेसाठीही केला जातो. त्याच्या नैसर्गिक फेस येण्याच्या गुणधर्मामुळे ते एक बहुउपयोगी हर्बल उत्पादन ठरते. आयुर्वेद रीठाला अत्यंत शुद्ध आणि फायदेशीर मानतो, कारण ते थेट निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. त्यात कोणतेही रसायन नसल्यामुळे ते सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)