Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
अभिनेत्री कंगना रनौतनेही या जाहिरातीवर आणि कृतिच्या भूमिकेवर टीका केली होती. महिलांकडे आज कपड्यांच्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मग रक्षाबंधनासारख्या प्रसंगी विशिष्ट प्रकारचे कपडे का निवडावेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

Kriti Sanon Raksha Bandhan : बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सध्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून सुरू झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. या वादावर कृतिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृतिच्या पोस्टला पाठिंबा देत ती आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महिला काय परिधान करते, काय करते…
राहुल गांधी यांनी कृतिची पोस्ट शेअर करताना महिलांच्या स्वातंत्र्याबाबत आपली भूमिका मांडली. महिला काय परिधान करते, काय करते किंवा कुठे जाते, हा तिच्या स्वतःच्या निवडीचा विषय आहे, असे त्यांनी म्हटले. महिलांनी आपल्या स्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल त्यांना ट्रोल करणे थांबवावे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.
- rahul gandhi
रक्षाबंधन हा बहीण-भावातील प्रेमाचा उत्सव
याआधी कृति सेननने रक्षाबंधनाच्या निमित्ताने केलेल्या पोस्टमध्ये सणाचे महत्त्व कपड्यांपेक्षा त्यामागील भावना आणि नात्यांमध्ये असल्याचे म्हटले होते. रक्षाबंधन हा बहीण-भावातील प्रेम आणि नात्यांचा उत्सव असल्याचे म्हटले होते.
संस्कृती ही मनात असते
महिलांच्या कपड्यांवरून सतत प्रश्न उपस्थित करण्याच्या मानसिकतेवरही कृतिने नाराजी व्यक्त केली. एखाद्या महिलेचा सन्मान, तिची संस्कृती किंवा परंपरांशी असलेले नाते केवळ तिच्या कपड्यांवरून ठरवता येत नाही, असं कृती सेनन म्हणाली होती. संस्कृती ही मनात असते, कपड्यांच्या गळ्याच्या आकारात नाही, असं परखड मतही तिने व्यक्त केलं होतं.
कगंना रनौत यांची टीका
दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतनेही या जाहिरातीवर आणि कृतिच्या भूमिकेवर टीका केली होती. महिलांकडे आज कपड्यांच्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मग रक्षाबंधनासारख्या प्रसंगी विशिष्ट प्रकारचे कपडे का निवडावेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
राहुल यांच्या पाठिंब्यामुळे चर्चांना उधाण
कृति सेननची पोस्ट आणि राहुल गांधींचा पाठिंबा यामुळे सोशल मीडियावर महिला स्वातंत्र्य, कपडे, संस्कृती यावर आता चर्चा रंगली आहे. या मुद्द्यावर काही जण कृतिच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काही जण जाहिरातीच्या सादरीकरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

