उन्हाळ्यात मँगो शेक पिताय ? जाणून घ्या फायदे आणि नुकसान, या लोकांनी अजिबात पिऊ नये

उन्हाळ्यात प्रत्येकालाच मँगो शेक पिणे आवडते. हे शरीरात ताजेपणा आणण्यास मदत करते. पण प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि नुकसान दोन्ही असतात. तर मग उन्हाळ्यात मँगो शेक पिण्याचे फायदे आणि नुकसान होऊ शकतो, तसेच कोणत्या लोकांनी ते पिऊ नये, याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया.

उन्हाळ्यात मँगो शेक पिताय ? जाणून घ्या फायदे आणि नुकसान, या लोकांनी अजिबात पिऊ नये
मँगो शेक
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: Apr 17, 2025 | 8:05 PM

उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकजण आंबा खाण्यास आतुर असतात. आंबा हा हंगाामी फळ असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात याला खूप मागणी असते. त्यात आपल्यापैकी क्वचितच असे कोणी असेल ज्याचा आंबा फेव्हरेट नसेल. आंबा हा सगळयांच्या आवडीचा फळ आहे आणि यांचे कारण म्हणजे त्याची चव. तर उन्हाळ्यात आपण कच्च्या कैरी पासून तयार केले पन्ह ते पिकलेल्या आंब्यापासूप ज्यूस करून पित असतो. तर यापैकी मँगो शेक सर्वात सामान्य आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना मँगो शेक आवडीने पितात. दूध आणि पिकलेल्या आंब्यांपासून बनवलेला मँगो शेक उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने करतो.

आंब्यामध्ये फोलेट, पोटॅशियम, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए, सी, ई, के आणि बी6 सारखे पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात जसे की जीवनसत्त्व अ डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. अशातच उन्हाळ्यात मँगो शेक पिण्याचे फायदे आपल्या शरीराला होत असतात, तसेच यांच्या अती सेवनाने नुकसान देखील होत असतात. तसेच मँगो शेक काही लोकांनी प्यायल्याने त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात. चला तर मग याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊयात.

मँगो शेक पिण्याचे फायदे

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील मुख्य आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल यांच्या सांगण्यानुसार, उन्हाळ्यात मँगो शेक पिणे खूप चविष्ट आणि थंड असते, परंतु ते पिण्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि त्वचेला सुधारण्यास मदत करते. आंब्याचा गर दुधात मिक्स करून मँगो शेक तयार होतो. हा शेक उर्जेचा चांगला स्रोत बनतो, जो शरीराला ऊर्जा प्रदान करतो आणि उन्हात थकवा कमी करतो.

मँगो शेक कोणी पिऊ नये?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मँगो शेक मर्यादित प्रमाणात सेवन करावे, विशेषतः मधुमेही रुग्णांनी ते टाळावे कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. याशिवाय, वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी मँगो शेक कमी प्यावा कारण त्यात कॅलरीज जास्त असतात. बऱ्याच वेळा लोकं त्यात जास्त साखर मिक्स करतात ज्यामुळे ते आरोग्यास आणखी हानिकारक ठरू शकते. गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा यकृताशी संबंधित समस्या असलेल्यांनीही मँगो शेक काळजीपूर्वक प्यावा किंवा ते पिणे टाळावे.

तज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते, मर्यादित साखरेसह दिवसातून एकदा लहान ग्लासमध्ये मँगो शेक पिणे फायदेशीर ठरू शकते, परंतु ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते. म्हणून, उन्हाळ्यात तुम्ही मँगो शेक नक्कीच प्यावे, परंतु तुमच्या शरीराच्या गरजेनुसार ते संतुलित प्रमाणात प्यावे. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)