प्रवासादरम्यान या वस्तू तुम्ही मेट्रोमधून घेऊन जाऊ शकत नाही; अन्यथा पडेल महागात

मेट्रो प्रवासाचे काही महत्त्वाचे नियम आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते. इतर प्रवासांप्रमाणेच मेट्रोमध्येही काही वस्तू सोबत नेण्यास सक्त मनाई आहे. या वस्तू घेऊन गेल्यास दंड भरावा लागू शकतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

प्रवासादरम्यान या वस्तू तुम्ही मेट्रोमधून घेऊन जाऊ शकत नाही; अन्यथा पडेल महागात
metro rules
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2025 | 6:10 PM

रेल्वे प्रवास , विमान प्रवासाचे जसे नियम असतात. जसे की कोणत्या वस्तू या प्रवासादरम्यान घेऊन जाऊ नये याबद्दल अनेक नियम असतात. त्याच प्रमाणे मेट्रो प्रवासाचे देखील बरेच नियम असतात. ज्या बद्दल फार कोणाला माहित नसतं.चला जाणून घेऊयात की मेट्रो प्रवासादरम्यान नक्की कोणत्या वस्तू घेऊन जाण्यास बंदी असते. आणि जर या नियमांचे पालन केले नाही तर नक्कीच दंड भरावा लागू शकतो.

अशा काही वस्तू मेट्रो प्रवासादरम्यान घेऊन जाऊ शकत नाही.

मेट्रो ही वाहतूक आणि वाहतुकीच्या सर्व पद्धतींमध्ये सर्वात सुरक्षित मानली जाते. कारण एकदा मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर नक्कीच तुमच्या बॅग वैगरे तपासल्या जातात. स्कॅनर मशीनमध्येही चेक केल्या जातात. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील असतात. त्यामुळे तेवढी सुरक्षा घेतली जाते. त्यामुळे असे अनेक वस्तू आहेत ज्या तुम्ही मेट्रो प्रवासादरम्यान घेऊन जाऊ शकत नाही. त्या वस्तू घेऊन गेल्यास कारवाई होऊ शकते किंवा दंड भरावा लागू शकतो.

बनवाट किंवा खोट्या वस्तू देखील घेऊन जाऊ शकत नाही

डीएमआरसीच्या नियमांनुसार, या वस्तू मेट्रोमध्ये नेण्यास मनाई आहे. उत्सवांच्या काळात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाते. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा ठेवली जाते. दरम्यान कधीकधी काही वस्तू खोट्या असतात पण त्या देखील सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोमधून घेऊन जाण्यास मनाई केलेली असते. जसे की खोटी बंदूक घेऊन जाऊ शकत नाही. तसेच चाकू, कात्री, तलवारी, ब्लेड, पिस्तूल इत्यादी धारदार आणि टोकदार शस्त्रे, स्क्रूड्रायव्हर, प्लायर्स, टेस्टर इत्यादी साधने, हँडग्रेनेड, गनपावडर, फटाके, प्लास्टिक स्फोटके किंवा इतर स्फोटक पदार्थांसारखी स्फोटके, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोलियम, रंग, ओल्या बॅटरी किंवा इतर ज्वलनशील पदार्थ. अशा वस्तू घेऊन जाण्यास मनाई असते.

मेट्रोमध्ये ही साधने घेऊन जाण्यास मनाई आहे

याव्यतिरिक्त, स्क्रूड्रायव्हर्स, प्लायर्स, टेस्टर आणि इतर हाताने वापरता येणारी साधने घेऊन जाऊ शकत नाही. या साधनांचा गैरवापर केला जाऊ शकतो आणि शस्त्रे म्हणून वापरला जाऊ शकतो, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

मेट्रोमध्ये स्फोटक पदार्थांनाही बंदी आहे.

मेट्रोमध्ये ग्रेनेड, गनपावडर, फटाके, प्लास्टिक स्फोटके इत्यादी कोणतेही स्फोटक पदार्थ वाहून नेण्यास सक्त मनाई असते. हे केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक नाहीत तर संपूर्ण स्टेशन किंवा ट्रेनलाही धोका निर्माण करू शकतात.

मेट्रोमध्ये ज्वलनशील पदार्थांनाही मनाई आहे.

शिवाय, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, रंग, ओल्या बॅटरी इत्यादी ज्वलनशील पदार्थांनाही आग लागण्याच्या धोक्यामुळे सक्त मनाई आहे. मेट्रोमध्ये या वस्तू घेऊन जाण्यावर दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.

मेट्रोमध्ये हे द्रव पदार्थ घेऊन जाऊ शकत नाही

तेल, तूप आणि इतर द्रव पदार्थ उघडपणे वाहून नेण्यास देखील मनाई आहे. आवश्यक असल्यास, ते हवाबंद डब्यात साठवले पाहिजेत.

मेट्रोमध्ये बनावट किंवा खोटी शस्त्रे देखील बंदी आहेत

विशेषतः खेळण्यांच्या बंदुका, तलवारी किंवा शस्त्रांसारखी दिसणारी खेळणी वापरण्यास मनाई आहे. यामुळे इतर प्रवाशांना भीती वाटू शकते आणि त्यांना खरा धोका समजण्याची चूक होऊ शकते.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे.