महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक, कारण तुम्हाला माहिती आहे का ?

| Updated on: Mar 05, 2022 | 11:45 AM

जाहीर झालेल्या आकडेवारीवरून अमेरिकेत एका वर्षात 7 लाख 35 हजार लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यापैकी 5 लाख लोकांचा पहिल्यांदा हृदयविकाराचा विकाराचा झटका येतो. 2016 मध्ये जामा इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशित नॉर्वेच्या ट्रोम्सो अभ्यासानुसार पुरूष वयाच्या एका स्थानावर पोहचल्यानंतर त्याला झटका येण्याचं प्रमाण वाढतं असल्याचं पाहायला मिळालं आहे.

महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक, कारण तुम्हाला माहिती आहे का ?
फाईल फोटो
Image Credit source: google
Follow us on

मुंबई –  आत्तापर्यंत जगात महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे. कमी वयात अधिक पुरूषांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू देखील झाला आहे. ही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण सध्या तरूणांच्यामध्ये अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. सीडीसीच्या आवाहलानुसार महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच हृदयविकाराचा झटक्याने अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा (australia) महान गोलंदाज शेन वार्न (Shane Warne) यांना काल हृदयविकाराचा झटक्याने 52 व्या वर्षी निधन झाले. अचानक मृत्यू झाल्याने देशात अनेकांनी हळहळ व्यक्त केली. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रीवेंशन यांनी त्यांचं कारण सांगितलं आहे.

7 लाख 35 हजार नागरिक हृदयविकाराचे शिकार

जाहीर झालेल्या आकडेवारीवरून अमेरिकेत एका वर्षात 7 लाख 35 हजार लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यापैकी 5 लाख लोकांचा पहिल्यांदा हृदयविकाराचा विकाराचा झटका येतो. 2016 मध्ये जामा इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशित नॉर्वेच्या ट्रोम्सो अभ्यासानुसार पुरूष वयाच्या एका स्थानावर पोहचल्यानंतर त्याला झटका येण्याचं प्रमाण वाढतं असल्याचं पाहायला मिळालं आहे. तर हा आकडा महिलांच्यापेक्षा पुरूषांमध्ये अधिक आहे. याच्या तपासासाठी आत्तापर्यंत 34 हजार लोकांची चाचणी करण्यात आली आहे. 1979 ते 2012 पर्यंत हृदयविकाराचा झटका आलेल्या 2 हजार 800 लोकांवरती सुध्दा तपासणी करणा-या लोकांचे लक्ष आहे. कोलेस्टेरॉलची पातळी, उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च बॉडी मास इंडेक्स आणि शारीरिक हालचालींकडे बारकाईने पाहिल्यानंतर, संशोधकांना असे आढळले की या सर्व जोखीम घटक हृदयविकाराच्या झटक्यामध्ये मोठ्या लिंग अंतर दर्शवत नाहीत. मग महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय?

या वयात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक

अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येतो, परंतु परुषांना वयाच्या 45 नंतर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आत्तापर्यंतच्या निदर्शनाल आले आहे. तसेच महिलांच्या मध्ये हे प्रमाण वयाच्या 55 वर्षांनंतर अधिक असल्याच समजतंय. स्त्रिया एथेरोस्क्लेरोसिसपासून अधिक संरक्षित असतात. एथेरोस्क्लेरोसिस ही अशी स्थिती आहे जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा (फॅटी डिपॉझिट) हृदयविकाराचा धोका वाढवते. इस्ट्रोजेनची उच्च पातळी स्त्रियांना हृदयविकारापासून वाचवते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू तिघा सख्ख्या भावंडांचा मृत्यू, ऊसतोड कामगाराच्या कुटुंबावर शोककळा

VIDEO: राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताहेत; राऊतांची खोचक टीका

Shane Warne Demise: विश्वास नाही बसणार! शेन वॉर्नच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील