VIDEO: राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताहेत; राऊतांची खोचक टीका

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यानंतरही राज्यपालांनी काहीच निर्णय न घेतल्याने त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींवर जोरदार हल्ला चढवला आहे.

VIDEO: राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताहेत; राऊतांची खोचक टीका
राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताहेत; राऊतांची खोचक टीका
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 11:20 AM

मुंबई: राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी आघाडीच्या (mahavikas aghadi)  शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यानंतरही राज्यपालांनी काहीच निर्णय न घेतल्याने त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यपाल कोश्यारींवर जोरदार हल्ला चढवला आहे. कॅबिनेटमधील प्रमुख सदस्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखेविषयी कळवलं आहे. राज्यपालांना विधिमंडळाचं स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचं महत्त्व कळत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख दिली पाहिजे, असं सांगतानाच राज्यपाल हे भापजचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं. तसेच फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरूनही भाजपवर हल्ला चढवला.

राज्यपालांना पदावरून हटवलं पाहिजे, असं वाटतं का? असा सवाल संजय राऊत यांना केला असता, असं सरकारचं म्हणणं नसून महाराष्ट्राचं म्हणणं आहे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत. हे या राज्यातील घटनात्मक पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही, असा टोला त्यांनी लगावला. या देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे हे मी वारंवार सांगतोय, अशा प्रकारच्या घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय लोकांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असा टोलाही त्यांनी राज्यपालांना नाव न घेता लगावला.

लोकशाहीसह रोजगारही धोक्यात

धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी भाजप मोर्चा काढणार आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी हा मोर्चा होणार आहे, याकडेही राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. लोकशाही आणि स्वातंत्र्यच धोक्यात आलंय या देशातलं. या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह या रोजगारही धोक्यात आला आहे. या सर्वांविरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढावे लागतील, असा टोलाही त्यांनी भाजपच्या मोर्चावर लगावला.

मुंबईत दहशतवाद नाही

मुंबईत अजिबात दहशतवाद नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून कोणतंही दहशतीचं वातावरण नाही. तुम्ही दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी या राज्यातील जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, असंही ते म्हणाले.

त्याला विरोधक जबाबदार

अधिवेशनात काम होत नाही. त्याला जबाबदार विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नावर आणि विकासावर कामकाज व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. पण विरोधी पक्ष ते होऊ देत नाही. काल मी मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घ चर्चा केली. ठाकरे सरकारला काम करू द्यायचे नाही ही विरोधकांची भूमिका दिसतेय. याला लोकशाही आणि स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. ठिक आहे, जनता पाहत आहे, असंही ते त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे, गोव्यातही फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’; संजय राऊत यांचा हल्लबोल

BMC Elections | मुंबई मा जलेबी ने फाफडा… भाजपची वोटबँक फोडण्यासाठी शिवसेनेचं ग्रँड मिशन यशस्वी ठरणार का?

Maharashtra News Live Update : एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी शासनाकडून १० मार्चपर्यंत मुदत

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.