
वास्तुशास्त्रानुसार जसे स्वयंपाकघर, बेडरूम,देवघर जसे महत्त्वाचे असते. घरातील वस्तूंबाबतही नियम असतात. त्याचप्रमाणे बाथरूमबद्दलही वास्तुशास्त्रानुसार काही नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील ते चांगलं मानलं जात नाही. कसं ते जाणून घेऊयात.
बाथरूममध्ये बहुतेकदा असे पाहिले जाते की जिथे तुम्हाला सर्व आवश्यक वस्तू मिळू शकतात. पण बाथरूममध्ये काही वस्तू ठेवणं धोकादायक आहे. बाथरूममध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत आणि का ते पाहुयात.
बाथरूममध्ये ठेवू नयेत अशा 9 गोष्टी कोणत्या?
ब्रशेसपासून ते मेकअपच्या वस्तूंपर्यंत, बाथरूम ही अशी जागा आहे जिथे आपल्याला आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतात. येथे आवश्यक वस्तू साठवल्याने त्या वारंवार शोधाव्या लागण्याचा त्रास थोडा कमी होतो. तथापि, काही वस्तू अशा आहेत ज्या बाथरुममध्ये ठेवणे टाळल्या पाहिजेत. बाथरूममध्ये ठेवू नयेत अशा 9 गोष्टी कोणत्या त्याबद्दल जाणून घेऊयात.
मेडिसिन आणि व्हिटॅमिन
मेडिसिन आणि व्हिटॅमिन ही सर्वात आधी मनात येतात. बाथरूमच्या कपाटात कधीही कोणतेही औषधे ठेवणे टाळले पाहिजे. औषधं नेहमी थंड, कोरड्या जागी ठेवणे फायदेशीर असते. बाथरूममध्ये औषधे ठेवणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक आहे.
नॉन-वॉटरप्रूफ इलेक्ट्रॉनिक्स
नॉन-वॉटरप्रूफ इलेक्ट्रॉनिक्स कधीही बाथरुममध्ये ठेवू नये. यामुळे विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो. बाथरूममध्ये अशा वस्तू न ठेवणे हे आपल्या सुरक्षेसाठी चांगले आहे.
रेटिनॉल आणि व्हिटॅमिन सी
रेटिनॉल आणि व्हिटॅमिन सी उत्पादने बाथरूममध्ये ठेवू नयेत. ही उत्पादने अतिशय संवेदनशील पदार्थांनी भरलेली असतात आणि बाथरूमच्या तापमानामुळे ती खराब होऊ शकतात.
एरोसोल कॅन
एरोसोल कॅनही बाथरुममध्ये ठेवणे धोकादायक असते. यामध्ये प्रेशराइज्ड गॅस असतो जो स्प्रे, मिस्ट किंवा फोमच्या स्वरूपात असतो. उच्च तापमानामुळे त्याची गळती किंवा स्फोट होण्याची शक्यता असते.
परफ्यूम
पुढची वस्तू म्हणजे परफ्यूम. तुम्हालाही परफ्यूम बाथरूममध्ये ठेवण्याची सवय असेल तर आत्ताच बदला. कारण उष्ण आणि दमट तापमान परफ्यूमसाठी सुरक्षित नाही. ते ड्रॉवर किंवा इतर बंद जागेत बाहेर ठेवणे सर्वात सुरक्षित आहे.
रेझर
रेझर देखील बाथरुममध्ये ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. या यादीतील पुढचे नाव रेझर आहे. बरेच लोक असा विचार करतील की ते बाथरुममध्ये ठेवल्याने हवं तेव्हा वापरणे सोपे आहे. पण तसे करणे सुरक्षित नाही. ते तसेच बाथरुम ठेवल्याने ब्लेडमध्ये बॅक्टेरिया जमू शकतात.
पावडर, दागिने
पावडर, मेकअप उत्पादने, दागिने आणि पुस्तके, मासिके देखील बाथरूममध्ये ठेवू नयेत. या वस्तूंची एक नियुक्त जागा असते आणि ती फक्त तिथेच ठेवावीत.