Vacation Trip | मुंबईकरांनो नव्या वर्षात ‘शॉर्ट ट्रीप’चं प्लॅनिंग करताय? मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

| Updated on: Jan 02, 2021 | 11:06 AM

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अगदी विकेंडचा मुहूर्त लाभला आहे. अशातच सगळे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नव्या ठिकाणांचा शोध घेत आहेत.

Vacation Trip | मुंबईकरांनो नव्या वर्षात ‘शॉर्ट ट्रीप’चं प्लॅनिंग करताय? मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!
Follow us on

मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अगदी विकेंडचा मुहूर्त लाभला आहे. अशातच सगळे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नव्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता जवळच्या ठिकाणांना पसंती दिली जात आहे. मुंबईतील धकाधक आणि धावपळीमुळे आपल्याला नेहमीच शहरात सुट्ट्यांचा आनंद घेण्यापेक्षा, घरापासून-मुंबईपासून दूर कुठेतरी निवांत जागी विकेंड किंवा सुट्ट्या साजऱ्या करण्याची इच्छा होत असते. अशावेळी, आपल्याला शहराच्या बाहेर एखाद्या साहसी ट्रेकवर जायचे असेल, किंवा निर्सगाच्या सहवासात काही काळ शांतपणे घालवायचा असेल तर, मुंबईजवळील ‘या’ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे (New Year 2021 Vacation Trip Near Mumbai).

पवना-भंडारदरा तलाव :

शहराच्या धकाधकीच्या जीवनातून काहीकाळ रिलॅक्स व्हायचे असेल, तर टेंट कॅम्पिंग हा उत्तम पर्याय आहे. तलावाच्या किनारी तंबू टाकून, कॅम्पफायर आणि सहभोजन करत संगीत ऐकण्याचा आनंद तुम्ही या ठिकाणांवर लुटू शकता. यासाठी मुंबई जवळील लोकप्रिय ठिकाण म्हणजे पवना आणि भंडारदरा. या ठिकाणी टेंट कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय तुम्ही स्वतःचा टेंट देखील नेऊ शकता.

माथेरान

मुंबईपासून फक्त 90 किमी अंतरावर असलेले हे हिल स्टेशन पश्चिम घाटांमध्ये समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर वसलेले आहे. हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे वाहनांना ज्याण्याची परवानगी नाही. येथे वृक्षाच्छादित भागांमधून आपण पायीच लांब फेरफटका मारू शकता. घोडेस्वारीदेखील करून शकता. लुईसा व हनीमून पॉईंटदरम्यान झीप-लायनिंगचा आनंद घेऊ शकता.

कलावंतीण दुर्ग-प्रबळ माची :

निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वत रंगांमध्ये ताठ मानेने उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळमाची एकाच दिवसात पाहणे, तसे मोठ्या धाडसाचे आहे. चढाई करण्यास सर्वात अवघड सुळका अशी या दुर्गाची ओळख आहे. प्रबळमाचीच्या शेजारी उभा असलेला ‘कलावंतीण दुर्ग’ म्हणजे केवळ उंचच उंच एक सुळका आहे. जास्त उंची आणि दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या यामुळे दुर्गाच्या सर्वात वर जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुम्हाला साहसाची आवड असेल, आणि एक दिवसाच्या ट्रेकची योजना आखत असाल तर, मुंबई जवळच्या या ‘कलावंतीण दुर्गा’ला नक्की भेट दिलीच पाहिजे. प्रबळमाचीवर राहण्याची आणि खाण्याची सोय उपलब्ध आहे (New Year 2021 Vacation Trip Near Mumbai).

महाबळेश्वर :

तुमची सुट्टी काहीशी लांबणारी असेल, तर मुंबईपासून साधारण 6-7 दूर असलेले, महाराष्ट्रातले सगळ्यात पसंतीचे थंडहवेचे ठिकाण अर्थात महाबळेश्वरला भेट देऊ शकता. महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणे फिरण्यासारखी आहेत. इथले महादेवाचे आणि पंचगंगेचे मंदिर, वेण्णा तलाव, सनसेट पॉइंट याठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. तसेच, स्ट्रॉबेरीची शेतं आणि स्थानिक बाजारात इतर फळांचा आस्वाद घेऊ शकता.

सिंहगड :

पूर्वीचा ‘कोंढाणा’ अर्थात आताचा ‘सिंहगड’ हा समस्त निसर्ग आणि गडप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मुंबईहून स्वतःच्या वाहनाने अथवा ट्रेनने अगदी 4 तासांत पुण्याला पोहचू शकता. त्यानंतर तिथून एसटी किंवा रिक्षाने तुम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी पोहचू शकता. यानंतर ट्रेकची योजना असल्यास गड चढा किंवा इथल्या लोकल वाहनाने गडाच्या पहिल्या दरवाज्यापर्यंत सहज पोहचता येणे देखील शक्य आहे. इथे तुम्ही एका दिवसांतही फिरू शकता. याशिवाय राहण्याची योजना असल्यास इथे तंबू टाकून राहून शकता. ऐतिहासिक वारसा आणि त्याच्या सानिध्यात राहून निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

(New Year 2021 Vacation Trip Near Mumbai)

हेही वाचा :