AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology Prediction : फटकळ आणि रागीट स्वभाव, सतत हट्ट; ‘या’ मुलांकाच्या मुलींची मित्र देखील देत नाही साथ

Numerology Mulank 4 Personality : अंकशास्त्रानुसार 'या' मुलांकाच्या मुली या अत्यंत हट्टी, रागीट बघायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणीच सोबत करत नाही.

Numerology Prediction : फटकळ आणि रागीट स्वभाव, सतत हट्ट; 'या' मुलांकाच्या मुलींची मित्र देखील देत नाही साथ
mulank 4 women's personalityImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2025 | 10:53 PM
Share

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याच भविष्य, आणि व्यक्तिमत्व कसं आहे हे ओळखण्यासाठी अंकशास्त्रात मुलांकाचा वापर केला जातो. हा मुलांक एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून काढला जातो. जन्मतारखेचा अंक आणि त्याची बेरीज यावरून मिळणाऱ्या एका अंकाला अंकशास्त्रानुसार मुलांक म्हणतात, ज्याच्या विश्लेषणातून एखाद्याच्या जीवनाचे अनेक रहस्य उलगडले जातात. याच पार्श्वभूमीवर अंकशास्त्रात असा एक मुलांक सांगितलेला आहे, ज्या मुलांकाच्या मुली या अत्यंत विक्षिप्त स्वभावाच्या असलेल्या बघायला मिळतात. या मुलांकाच्या मुलींना कधीच आयुष्यात कोणी साथ देत नाही. त्यांचे मित्र देखील त्यांच्या स्वभावाला कंटाळून त्यांना सोडून निघून जातात.

कोणता आहे तो मुलांक..

जर एखाद्या मुलीचा किंवा महिलेचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल तर तिचा मूलांक 4 असतो. अंकशास्त्रानुसार, अंक 4 हा राहू ग्रहाशी संबंधित असतो. राहू ग्रह हा थोड्याशा वेगळ्या विचाराचा, गूढ मानला जातो. त्यामुळे या मुलांकाच्या मुली देखील सहसा गूढ स्वभावाच्या, वेगळ्या विचारसरणीच्या आणि समाजात एक विशेष ओळख निर्माण करणाऱ्या आपल्याला बघायला मिळतील. 4 मुलांक असलेल्या महिलांची विचारसरणी खूप वेगळी असते आणि त्यांना गर्दीपासून दूर राहणे आवडते. त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची ताकद आहे.

कसा असतो 4 मुलांक असलेल्या मुलींचा स्वभाव

मुलांक 4 असलेल्या महिला या स्वतंत्र विचारसरणीच्या, मेहनती आणि सत्यवादी असतात. जे मनात असेल ते थेट बोलण्याच्या स्वभावामुळे या मुली काहींना फटकळ देखील वाटतात. या मुलींना कोणाचीही खोटी स्तुती, वाह वा करायला आवडत नाही. त्यांच्या या स्पष्ट स्वभावामुळे अनेक वेळा त्यांना नात्यात अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांच्या अशा वागण्याने या मुलींचे जोडीदारच नाही तर त्यांचे मित्र सुद्धा त्यांच्यासोबत फार काळ टिकत नाही. या मुलांकाच्या मुलींमध्ये कोणताही निर्णय क्षणात घेण्याची क्षमता असते. एखादा मोठा निर्णय घेताना त्या फार विचार करत बसत नाही. लगेच निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी देखील करतात. यांचे निर्णय अनेकवेळा बरोबर देखील सिद्ध होतात. मात्र या मुलांकाच्या मुली या काहीशा हट्टी स्वभावाच्या देखील असतात. त्यामुळे त्यांना नुकसान होते. या मुलींनी कितीही मित्रमैत्रीण बनवले तरी ते फार काळ टिकत नाहीत. या मुलींना धार्मिक बाबींवर गाढ श्रद्धा आहे. या मुली अभ्यासात देखील हुशार असतात. मुलांक 4 च्या मुली या सरकारी नोकऱ्या, बँकिंग किंवा तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रात यशस्वी होतात. या मुली जे काही करतात ते पूर्ण समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने करतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.