नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करा आणि वजन कमी करा, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: Jun 08, 2021 | 8:02 AM

ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्स देखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते.

नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करा आणि वजन कमी करा, वाचा याबद्दल अधिक !
ओट्स
Follow us on

मुंबई : ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्स देखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. ओट्समुळे पचनक्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रणात येते. ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ओट्स सारखा चांगला नाश्ता दुसरा काहीही असू शकत नाही. (Oats are extremely beneficial for weight loss)

जर आपण आहारामध्ये ओट्सचा समावेश करण्याचा विचार करत असाल, तर आपण ओट्सची चपाती खाऊ शकता. हा एक ट्रेंडी डायटरी हॅक आहे, जो वजन कमी करण्यात मदत करतो. ओट्स व्हिटामिन बी आणि फायबर समृद्ध असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते. हे शरीरातील हानिकारक घटकांचा निचरा करते.

100 ग्रॅम ओट्समध्ये किती पोषक तत्वे मिळतात पाहा. कॅलरी – 389, पाणी – 8%, प्रोटीन – 16.9 ग्रॅम, कार्ब्सन – 66.3 ग्रॅम, फायबर – 10.6 ग्रॅम चरबी – 6.9 ग्रॅम आपल्या शरिरातील विविध व्याधींना ग्लुटेन कारणीभूत असते. त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेताना ग्लुटेनमुक्त पदार्थ खायला पसंती दिली पाहिजे. अन्यथा आपल्याला पोटदुखी यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. ओट्सदेखील ग्लुटेनमुक्त पदार्थ आहे. त्यामुळे विविध व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी ओट्सचे सेवन उपयुक्त ठरेल.

केळी आणि ओट्सची स्मूदी लाभदायक आहे. यामध्ये भरपूर प्रथिने आहेत. त्यामुळे हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासही मदत करते. केळी आणि ओट्सची स्मूदी तयार करण्यासाठी तुम्हाला दालचिनी, मध, हळद, केळी, दूध आणि ओट्सची गरजेचं आहे. सर्व प्रथम, 1/2 कप ओट्स ब्लेंड करा. यानंतर त्यात इतर घटक घाला. त्यात केळीचे तुकडे, दालचिनीची पूड, दूध, मध आणि हळद घाला. या सर्व गोष्टींचे मिश्रण करा, ओट्स स्मूदी तयार होते. सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण दररोजच्या आहारात स्मूदी घेतली पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

(Oats are extremely beneficial for weight loss)