Omega-3 Foods Benefits : इम्युनिटी वाढवण्यासाठी ओमेगा-3चे 7 मुख्य स्त्रोत माहीत आहेत का?, वाचा सविस्तर

| Updated on: May 21, 2021 | 12:00 PM

कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. आपल्या शरीरात ओमेगा -3 फॅटी अॅसिडस असते.

Omega-3 Foods Benefits : इम्युनिटी वाढवण्यासाठी ओमेगा-3चे 7 मुख्य स्त्रोत माहीत आहेत का?, वाचा सविस्तर
ओमेगा-3
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. आपल्या शरीरात ओमेगा -3 फॅटी अॅसिडस असते. ओमेगा -3 मेंदू आणि डोळ्यांसाठी आवश्यक आहे. मात्र, हे ओमेगा -3 फॅटी अॅसिडस शरीरात नैसर्गिकरित्या बनत नाही. ओमेगा -3 फॅटी अॅसिडस आपल्याला काही पदार्थांमधून मिळते. (Omega-3 essential for boosting immunity)

ओमेगा -3 ओमेगा -3 फॅटी अॅसिडस आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. चला बघूयात असे कुठले पदार्थ आहेत, ज्यामुळे आपल्या शरीराला ओमेगा -3 फॅटी अॅसिडस मिळते.

अक्रोड – ओमेगा -3 ची गरज भागवण्यासाठी आपण आहारात अक्रोड घेऊ शकतो. अक्रोडमध्ये बरेच पौष्टिक घटक असतात. यात तांबे, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. हे पौष्टिक घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

सोयाबीन – सोयाबीनमध्ये ओमेगा -3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिडस् असतात. याव्यतिरिक्त, सोयाबीन हे प्रथिने, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिनचे मुख्य स्त्रोत आहे. हे जीवनसत्त्वे आणि खनिजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

फुलकोबी – फुलकोबीचे भाजी म्हणून आहारात सेवन केले जाते. फुलकोबीमध्ये ओमेगा -3 चे प्रमाण अधिक असते. यात मॅग्नेशियम, नियासिन आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक असतात.

मासे – सॅल्मन माशामध्ये ओमेगा 3 असते. ओमेगा 3 व्यतिरिक्त यात प्रोटीन, व्हिटॅमिन बी 5, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. हे पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात.

अंडी – आपण आपल्या आहारात अंडी समाविष्ट करू शकता. अंड्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि ओमेगा 3 अॅसिड असते. हे कोलेस्ट्रॉलशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते.

ब्लूबेरी – ब्लूबेरीमध्ये कॅलरी कमी असतात. यात ओमेगा 3 चे प्रमाण अधिक असते. याशिवाय यामध्ये इतरही अनेक पौष्टिक आणि अँटीऑक्सिडंट्स घटक असतात. ब्लूबेरी अँथोसॅनिन अँटीऑक्सिडेंट आहे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Omega-3 essential for boosting immunity)