दोस्ती असावी तर अशी; म्हातारपणातील दोस्ताला बनवलं हिरो; फोटोची ताकद काय असते ते मम्मिकाचे फोटो पाहिल्यानंतर कळेल

| Updated on: Feb 18, 2022 | 6:55 PM

माणसाच्या आयुष्यातील दोस्तीला तोड नाही, विश्वासाच्या नात्यात ती एकदा जोडली तर मग दोस्ती कुणी तोडतो म्हटलं तरी शक्य नाही. दोस्तीचे असे अनेक किस्से सांगितले जातात हा किस्सा मात्र जगात भारी आहे...

दोस्ती असावी तर अशी; म्हातारपणातील दोस्ताला बनवलं हिरो; फोटोची ताकद काय असते ते मम्मिकाचे फोटो पाहिल्यानंतर कळेल
Follow us on

मुंबईः माणसाच्या आयुष्यातील दोस्तीला तोड नाही, विश्वासाच्या नात्यावत ती एकदा जोडली तर मग दोस्ती (Friendship) कुणी तोडतो म्हटलं तरी शक्य नाही. दोस्तीचे असे अनेक किस्से सांगितले जातात हा किस्सा मात्र जगात भारी आहे कारण साधा मोलमजूरी (Labourer) करणारा दोस्त. काम मिळेल तिथं मजूरी करायची आणि पोट भरायचं हेच रोजच्या जगण्याचं गणित. पण केरळमधील 60 वर्षाचा एक रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूराचं नशीबच बदलून गेलं आहे. एका रात्रीत तो सेलिब्रेटिज (Celebrities) झाला आहे. लुंगी आणि शर्ट घालणारा हा ज्येष्ठ माणूस आता सूटा बुटात मॉडेलिंग करताना दिसत आहे. त्याच्या हे जे स्थित्यंतर झालं आहे त्याचे फोटो आणि व्हिडिओ आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत….


वेडिंग शूट करणाऱ्या एका कंपनीने एका फोटोत किती ताकद असते तेच दाखवून दिलं आहे. फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर शारिक वायलिल यांच्या कॅमेऱ्यामधून टिपलेले हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त असे व्हायरल झाले आहेत. शारिक SHK वेडिंग स्टुडिओचा संस्थापक आहे. याच शारिकने मम्मिकाचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ते सगळे फोटो शारिक यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.


मजूरी करणाऱ्या मम्मिकाच्या फोटोची गोष्ट सांगताना शारिक म्हणतो की, मम्मिका हा माझा शेजारी आहे. त्याला खूप दिवसांपासून वेगवगेळ्या अँगलने बघत होतो. त्याचे काही फोटो टिपावेत असं गेल्या चार वर्षापासून डोक्यात होतं कारण त्याच्याकडे फोटोग्राफीचा वेगळा चेहरा आहे. मी फोटोशूट केल्यावर वाटलं नव्हतं की त्याला एवढा मोठो चाहतावर्ग मिळेल.


मजूरी करणाऱ्या या साध्यासुध्या माणसाला ज्यावेळी या फोटोग्राफीविषयी विचारण्यात आले त्यावेळी ते मम्मिका म्हणाले की, ज्यावेळी इंटरनेटवर माझे फोटो सगळे आले त्यावेळी अनेक बातम्या आल्या आणि वाटलं की, माझ्या या फोटोंची कायतरी वेगळी आणि मोठी बातमी झाली. ट्रेंड्री ब्लेझर आणि सनग्लासेजमध्ये शारिकच्या जाहिरात कंपनीसाठी त्यांनी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत. त्यांच्या लूकला एक फॉर्मल लूक देण्यासाठी शारिकने मम्मिकाच्या हातात एक आयपॅड दिले आहे.


मजूरी करणारे मम्मिका रोजंदारीवर कधा सहाशे तर कधी हजार रुपये कमवतात. फोटोशूटसाठी आता त्यांचा सगळाच चेहरामोहराच बदलून गेला आहे. त्याचाही एक व्हिडिओ तयार झाला आहे. मम्मिकाच्या मेकओव्हरसाठी मेकअप आर्टिस्ट मजनस अराब्रम यांनी मदत केली आहे. मम्मिकाच्या या फोटोंना बघून अनेक जण आता त्यांची तुलना तमिळ अभिनेता विनायकबरोबर करत आहेत.


मम्मिका आणि त्यांच्या दोस्तीविषयी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, मम्मिका हा माझा नऊ वर्षापासूनचा मित्र आहे. एकदा नदीत पोहायला गेल्यावर मी बुडत असताना मम्मिकानेच मला वाचवले आहे. त्यावेळेपासून त्यांची आणि माझी दोस्ती आहे असे सांगितले