Post Diwali Detox: दिवाळीनंतर जाणवतोय थकवा- सुस्ती? शरीराला करा डिटॉक्स, फॉलो करा हे सोपे उपाय

दिवाळीतील धावपळ, खाण्यापिण्यातील बदल आणि रोजच्या कामाच्या व्यापामुळे शरीरात थकवा व सुस्ती जाणवू शकते. अशा वेळी शरीराला पुन्हा फ्रेश आणि उत्साही ठेवण्यासाठी हे सोपे सराव नक्की करून पाहा.

Post Diwali Detox: दिवाळीनंतर जाणवतोय थकवा- सुस्ती? शरीराला करा डिटॉक्स, फॉलो करा हे सोपे उपाय
दिवाळीनंतर जाणवतोय थकवा- सुस्ती?
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 09, 2026 | 12:02 PM

दिवाळीचा सण म्हटला की फराळ, मिठाई आणि वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी आलीच. या काळात खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात, रात्री उशिरापर्यंत जागरण होते. त्यात घराची साफसफाई, खरेदी, पाहुण्यांची ये-जा आणि सणाची तयारी यामुळेही बरीच धावपळ होते. दिवाळी संपल्यानंतर पुन्हा कामाचा व्याप सुरू झाल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. परिणामी थकवा, आळस आणि सुस्ती जाणवू लागते. अशा वेळी शरीराला पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी काही सोपे व्यायाम व ध्यानाचे प्रकार करता येतात. हे सराव नियमित केल्यास आरोग्यदायी दिनचर्येकडे पुन्हा वळण्यास मदत होऊ शकते.

रोज चालण्याची सवय लावा

शरीर सक्रिय ठेवण्यासाठी चालणे हा सोपा व्यायाम आहे. सकाळी किंवा संध्याकाळी चालण्यापासून सुरुवात करा. सुरुवातीला कमी अंतर चालावे आणि नंतर हळूहळू अंतर वाढवावे. शारीरिक क्षमतेनुसार दररोज ५ किलोमीटर चालण्याचे लक्ष्य ठेवू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

Loading...

भस्त्रिका प्राणायाम करा

आळस आणि सुस्ती कमी करण्यासाठी भस्त्रिका प्राणायामाचा सराव करू शकता. यामध्ये नाकाद्वारे लयबद्ध पद्धतीने श्वास आत घेतला आणि बाहेर सोडला जातो. शांत ठिकाणी मांडी घालून बसा, पाठ ताठ ठेवा आणि १० ते २० वेळा श्वास घेण्याचा व सोडण्याचा सराव करा. त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्या. उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सिद्धा वॉकचा सराव करा

सिद्धा वॉकमध्ये जमिनीवर इंग्रजी आठ (8) या आकड्याच्या आकारात चालायचे असते. यासाठी मोकळी जागा निवडून आठच्या आकारात एका दिशेने आणि नंतर विरुद्ध दिशेने चाला. दोन्ही दिशांना समान वेळ द्या. सुरुवातीला १० ते १५ मिनिटे हा सराव करू शकता. यामुळे शरीराचा समतोल आणि हालचालींमधील समन्वय सुधारण्यास मदत होते.

दिवा लावून ध्यानधारणा करा

मानसिक शांततेसाठी दिवा लावून ध्यानधारणा करू शकता. एका सुरक्षित ठिकाणी दिवा लावून त्यापासून थोड्या अंतरावर आरामात बसा. काही वेळ ज्योतीकडे पाहिल्यानंतर डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. ५ ते १० मिनिटे हा सराव केल्याने मन शांत राहण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते.

आरोग्यदायी सवयी नियमित ठेवा

दिवाळीनंतर पुन्हा सक्रिय होण्यासाठी कठीण व्यायाम करण्याऐवजी हळूहळू दिनचर्या सुधारा. चालणे, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा नियमित सराव करा. यासोबत संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि चांगली झोप याकडेही लक्ष द्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us