AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Kelkar: बिल्डरच्या गावगुंडांनी… अभिजीत केळकरची नवी पोस्ट पुन्हा चर्चेत, नेमकं काय म्हणाला?

Abhijeet Kelkar: अभिनेता अभिजीत केळकरने SRA प्रकरणावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचा अनुभव सांगितला आहे.

Abhijeet Kelkar: बिल्डरच्या गावगुंडांनी... अभिजीत केळकरची नवी पोस्ट पुन्हा चर्चेत, नेमकं काय म्हणाला?
Abhijeet kelkarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 12:01 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकर हा चांगलाच चर्चेत आहे. त्याने मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याने या पोस्टच्या माध्यमातून बिल्डरविरोधात सुरु असलेल्या लढ्यात SRA अधिकाऱ्यांकडून आपली बाजू ऐकून घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच तेथील नागरिकांवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. आता अभिजीत नेमकं काय म्हणाला? वाचा…

अभिजीत केळकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काय म्हटले वाचा…

“मी ही ह्याच संदर्भात लढतो आहे, मलाही SRA चा भीषण अनुभव आलाय, SRA ही अत्यंत भ्रष्ट यंत्रणा आहे असं माझं म्हणणं आहे, साध्या कर्मचाऱ्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत (अर्थात त्याला काही अपवाद आहेत)… मला आलेला अनुभव सांगतो…

माझ्या, बिल्डर विरुद्ध चाळीतले/आमच्या झोपडपट्टीतले रहिवासी ह्या लढ्यात SRA मधे २-३ वेळा सुनावणी (hearing) होती, ज्यात SRA च्या ऑफिसर्सनी दोन्ही बाजू ऐकून, निःपक्षपातीपणे निर्णय घेणे अपेक्षित/आवश्यक असते, जेणेकरून slum मध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर अन्याय होणार नाही आणि बिल्डरही चांगल्या पद्धतीने विकास घडवून आणेल इथे SRA म्हणजे (Slum Rehabilitation Authority म्हणजेच झोपडपट्टीचे पुनर्वसन करणारी यंत्रणा) हा अर्थ अपेक्षित आहे आणि SRA ने त्याप्रमाणे कारवाई करणे ही अपेक्षित आहे. परंतू… मला आलेल्या अनुभवानुसार इथल्या अधिकाऱ्यांना हा अर्थ मान्य नसावा किंवा ते स्वतःला देव मानत असावेत किंवा माननीय उच्च न्यायालयापेक्षाही आपण उच्च आहोत असा त्यांचा स्वतःविषयी गैरसमज असावा… SRA मधे एक अधिकारी मॅडम आहेत, त्या ह्याच कॅटेगरी मधे मोडतात (अर्थात मला कोणाचीही बदनामी करायची नसल्याने मी नाव इथे जाहिर करणार नाही) त्यांनी एकाही hearing ला आमची बाजू ऐकूनच घेतली नाही, बिल्डरची वकिलांची अख्खी फळीच्या फळी होती आणि आमच्या बाजूने मी आणि आमचे काही लोक… बिल्डरच्या वकिलांच बोलून झाल्यावर जेव्हा मी हात वर करून नंतर उभे राहून बोलायचा प्रयत्न केला तेव्हा या मॅडम आमचं काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हत्या उलट मी ऑर्डर देऊन 24 तासांच्या आत तुमची झोपडपट्टी जमीनदोस्त करून टाकीन आणि मी ऑर्डर दिल्यावर कोर्टही काही करू शकणार नाही असं त्या म्हणाल्या आणि असा त्यांचा दावाही होता, हाच अनुभव २-३ hearings ना मी स्वतः घेतलाय. अर्थात त्यानंतर, तुम्ही २४ तासांच्या आत घरं जमीनदोस्त करून दाखवाच, तुम्ही आणलेल्या बुलडोझर खाली झोपणारा पहिला मीच असेन असं मी ठणकावून सांगितल्यावर आमच्या झोपडपट्टीतले लोक उठून माझ्या समर्थनार्थ ओरडू लागले त्यावरही या मॅडम, आमचं काहीही ऐकून न घेता पेपर्स घेऊन आत निघून गेल्या.

ह्याला आता साधारण दोन महिने झाले… नंतर त्यांनी ऑर्डर्स दिल्या त्यानंतर आमच्या लोकांनी AGRC मध्ये जाऊन त्यावर स्टे आणला, जो अजून तरी आहे पण so called लोकप्रतिनिधींच्या (ज्यांना आम्हीच निवडून दिलं, बिल्डरने नाही किंवा बिल्डरच्या गावगुंडांनीही नाही) दबावामुळे तो ह्या दिवाळीच्या शासनाच्या सुट्ट्यानंतर कुठल्याही क्षणी त्या demolition च्या नोटीसवर सह्या होऊ शकतात आणि झोपड्या तात्काळ जमीनदोस्त होण्याची टांगती तलवार आमच्या लोकांवर आहे…

आमच्या एरियातल्या अनेक पात्र लोकांना केवळ ते बिल्डरच्या विरोधात आहेत म्हणून अपात्र करण्यात आलं आहे, त्यांच्याकडे योग्य ती कागदपत्र, दाखले असतानाही… आणि बिल्डरच्या गावगुंडांनी ह्यात स्वतःच्या अनेक अनधिकृत झोपड्या दाखवून, पात्र करवून, प्रोजेक्ट मधल्या पात्र आणि बिल्डरच्या बाजूने असणाऱ्या लोकांची मेजॉरिटी आहे असं दाखवून, भासवून, पैसे चारून आम्हाला ते, आम्ही minority मध्ये आहोत आणि चांगल्या प्रोजेक्टला आम्ही उगाचच विरोध करतोय असं भासवत आहेत.

SRA मधे अपात्रच पात्र करून द्यायचा (under the table) रेट ही आहे, ३-३.५० लाखांच्या आसपास. आता मला सांगा, आधीच गरीब लोक, अशिक्षित सुद्धा त्यांनी काय करायचं? बिल्डर बरोबर गेलो नाही तर अपात्र होणार आणि हाती काहीच लागणार नाही… हे सगळं करून, लोकांना घाबरवून बिल्डरने १४००० रुपये भाडं देऊन लोकांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, आजूबाजूच्या कुठल्याही एरियात १४००० रुपयात भाड्यावर घर मिळणं आणि ते ही इतक्या लोकांना, अशक्य आहे… हे सगळं राजरोसपणे चाललंय, आपल्या मुंबईत so called लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्यामुळेच…

माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी आणि माननीय उपमुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांना, माझी हात जोडून विनंती आहे… ह्या प्रकरणाची दखल घेऊन, सखोल चौकशी व्हावी, कागदपत्रांची योग्य ती पडताळणी व्हावी आणि ती होईपर्यंत demolition ची कारवाई होऊ नये आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांना तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता, लोकांनी मला कितीही शिव्या घातल्या तरीही माझा तुमच्यावर विश्वास आहे आम्ही redevelopment च्या विरोधात नक्कीच नाही, आम्हाला भेटीची वेळ द्या, आमचं ऐकून घ्या”

Follow Us
रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा...
Gokul : रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा
राज्याच्या राजकारणात काय घडतंय, गंमत बघायची; राऊतांचं सूचक विधान....
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात काय घडतंय, त्याची गंमत बघायची; संजय राऊतांचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
Gokul : गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar : उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा होणार?
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
Sushma Andhare On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...