
आपण नवीन चप्पलांची खरेदी करतो, तेव्हा त्यांची चकाकी आणि स्वच्छपणा आपल्याला खूप आवडतो. पण जर कुठे स्क्रॅच किंवा डाग पडला, तर त्यांची चमक लगेचच कमी होते. मग त्या कितीही महागड्या असल्या, एकदा खराब वाटू लागल्या की आपण त्या बाजूला ठेवतो आणि नवीन चप्पल घेण्याचा विचार करतो.
पण आता काळजी करण्याची गरज नाही! वारंवार नवीन चप्पल घेण्यापेक्षा, काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जुन्या चप्पलांना पुन्हा नव्यासारखं रूप देऊ शकता. खाली दिलेले 5 घरगुती उपाय लेदर, रबर, कॅनव्हास किंवा स्वेडच्या चप्पलांवरील स्क्रॅचेस आणि डाग हटवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात.
1. टूथपेस्ट
लेदर, पेटंट लेदर, सिंथेटिक लेदर किंवा रबरच्या चप्पलांवर स्क्रॅचेस किंवा डाग पडले असतील, तर टूथपेस्ट वापरून ते स्वच्छ करता येतात. एक जुना टूथब्रश घ्या, त्यावर थोडी टूथपेस्ट लावा आणि स्क्रॅच असलेल्या भागावर गोलाकार रगडा. काही वेळाने एक थोडा ओलसर कपडा घेऊन तो भाग स्वच्छ करा आणि चप्पल सुकण्यासाठी ठेवा. स्क्रॅच सहज निघून जातील आणि चप्पल पुन्हा चमकू लागतील.
2. नेल पॉलिश रिमूव्हर (Acetone-Free)
नेल पॉलिश रिमूव्हर, विशेषतः अॅसिटोन नसलेला, लेदर आणि रबरच्या चप्पलांवरील डाग काढण्यासाठी उपयोगी ठरतो. एक कॉटन बॉल घ्या, त्यावर थोडा रिमूव्हर टाका आणि स्क्रॅच असलेल्या भागावर सौम्यपणे रगडा. काही वेळातच डाग हलके होतील किंवा पूर्णपणे निघून जातील. मात्र अॅसिटोनयुक्त रिमूव्हर वापरू नका, कारण तो चप्पलांच्या पृष्ठभागाला नुकसान पोहोचवू शकतो.
3. बेकिंग सोडा
कॅनव्हास किंवा फॅब्रिकच्या चप्पलांवर डाग पडले असतील, तर बेकिंग सोडा हा एक प्रभावी उपाय आहे.
एका छोट्या वाटीत थोडा बेकिंग सोडा घ्या. टूथब्रश पाण्यात भिजवा आणि त्यावर बेकिंग सोडा लावून डाग असलेल्या भागावर रगडा. ही प्रक्रिया 2-3 वेळा करा. नंतर ओल्या कपड्याने पुसा किंवा पाण्याने हलकं धुवा आणि चप्पल सुकवण्यासाठी ठेवा.
4. डिश वॉशर
फॅब्रिक किंवा कॅनव्हास चप्पलांवरील स्क्रॅचेस काढण्यासाठी बर्तन धुण्यासाठी वापरला जाणारा डिश वॉशर वापरू शकता. एक थेंब डिश वॉशर स्क्रॅच असलेल्या भागावर लावा आणि ब्रशने रगडा. नंतर कोमट पाण्याने धुवा किंवा ओल्या कपड्याने पुसून सुकवण्यासाठी ठेवा. हा उपाय खूपच सोपा आणि प्रभावी आहे.
5. पेंसिल इरेजर
स्वेडच्या चप्पलांवर हलके स्क्रॅचेस असतील, तर पेंसिल इरेजर हा एक उत्तम उपाय आहे. एक सामान्य पेंसिल रबर घ्या आणि स्क्रॅच असलेल्या भागावर सौम्यपणे रगडा. काही वेळात स्क्रॅच निघून जातील आणि चप्पल पुन्हा नव्यासारख्या दिसतील.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)