मसाला चहा बनवण्यासाठी आधी आले टाकावे की चहापावडर? शेफ रणवीर ब्रार यांनी सागितली रेसिपी

परफेक्ट चहा बनवण्यासाठी आधी आले किंवा चहा पावडर पाण्यात टाकावी असा प्रश्न आपल्यापैकी अनेका सतावत असतो. तर आजच्या लेखात आपण शेफ रणबीर ब्रार या चहा बनवण्याची पुर्ण रेसिपी सांगितली आहे ते जाणून घेऊयात.

मसाला चहा बनवण्यासाठी आधी आले टाकावे की चहापावडर? शेफ रणवीर ब्रार यांनी सागितली रेसिपी
Chai
Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 31, 2025 | 11:01 PM

हिवाळा ऋतूची सुरूवात होताच आपण गरम गरम पदार्थ खाण्यास सुरूवात करत असतो. अशातच या हिवाळ्यात थंड वारा, थोडा सूर्यप्रकाश आणि हातात सुगंधी मसाला चहाचा कप, यापेक्षा चांगला मिलाफ कोणता असू शकतो? विशेषतः दुपारी जेव्हा जेवणानंतर आपल्यापैकी अनेकांना झोप येऊ लागते, तेव्हा कडक चहाची गरज आणखी तीव्र होते. परंतु बहुतेक लोकं परिपूर्ण मसाला चहा बनवण्यासाठी आधी आले टाकावे की चहा पावडर याबद्दल खूप गोंधलेले असतात.

तर हाच गोंधळ दुर करण्यासाठी शेफ रणवीर ब्रार यांनी परफेक्ट मसाला चहाची एक खास रेसिपी शेअर केली आहे, ज्याचा एक घोट तुमची दुपारची झोप उडवून देईल. ही कोणतीही सामान्य रेसिपी नाही तर त्यांचे वडील ईश्वर सिंग यांची खास मसाला चहा आहे, जी वर्षानुवर्षे घरी बनवली जाते. मसाल्यांचा सुगंध, दुधाचा मलाईपणा आणि आल्याचा तिखटपणा,हा चहा केवळ शरीरालाच नाही तर हृदयालाही उबदार करतो. तुम्हाला जर हिवाळ्यात खरी शांतता हवी असेल तर ही मसाला चहाची रेसिपी नक्कीच ट्राय करायला हवी. जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी…

स्टेप 1: पाणी उकळवा

शेफ रणवीर ब्रार सांगतात की मसाला चहा बनवण्यासाठी प्रथम 2 ते 2.5 कप पाणी घ्या. जर तुम्हाला 4 कप चहा बनवायचा असेल तर. तसेच तुम्ही तुमच्या गरजेनुसार नेहमी बनवत असाल तेवढे पाणी घेऊन उकळू द्या.

स्टेप 2: आले किसून टाका

पाणी उकळल्यावर त्यात आलं किसून टाका. त्यानंतर थोडावेळ आणखीन पाणी 5 मिनिटं उकळू द्या

स्टेप 3: साखर आणि चहा पावडर टाका

आल्याचे पाणी उकळल्यानंतर 4 चमचे साखर आणि 2 चमचे तुम्ही वापरत असलेली नेहमीची चहा पावडर टाका. हे सर्व चांगले मिक्स करा आणि कमीत कमी 2-3 मिनिटे उकळू द्या.

स्टेप 4: दूध मिक्स करा

चहाला जास्त किंवा मध्यम आचेवर 2-3 मिनिटे उकळू दिल्यानंतर 1.5 कप दूध टाका. दूध टाकताच चहाचा रंग बदलताना दिसेल. तेव्हा चहा 1 ते 2 मिनिटे उकळवा. अशा रितीने मसाला चहा तयार होईल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)