बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी

बदलत्या हवामानात लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना विषाणूजन्य संसर्गामुळे आजारांची लागण होते. त्यामुळे फ्लूसारखे विषाणूजन्य आजार खूप त्रास देतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील सर्व लोकांना या काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ज्यामुळे हंगामी आजार त्रास देणार नाहीत.

बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त या छोट्या गोष्टींची घ्या काळजी
Simple tips to avoid seasonal flu cold cough
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 16, 2025 | 9:29 PM

मार्च महिना सुरू झाला असून दिवसा कडक उन्हाच्या झळा बसत आहेत, पण रात्री मात्र हवामानात थंडावा असल्याने उष्ण आणि थंड हवामानातील या बदलाचा प्रत्येकाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसून येतोय. त्यामुळे हवामान बदलासोबत आजार आणि संसर्गाचा धोका वाढणं नवं नाही. विशेषत: फ्लूसारख्या हंगामी आजारांचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये ताप, घशात खवखव, नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे या काळात मुलांच्या आरोग्यावर विशेषतः परिणाम होतो. यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे याशिवाय काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

हवामानातील बदलाबरोबरच आता वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसुन येतो. यामुळे आपल्यापैकी अनेकांना श्वसनाच्या समस्या आधिक जाणवू लागल्या आहेत. तर यामध्ये सर्वाधिकरित्या लहान मुलांना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि या हंगामात न्यूमोनिया सर्वाधिक प्रमाणात होत असतो. ज्यांना आधीच श्वसनाचा त्रास सतावत आहे त्यालोकांना न्यूमोनिया होऊ शकतो. त्यामुळे या आजारांपासून स्वत:चा व घरातील प्रत्येक व्यक्तींचा बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊया.

रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची

हंगामी आजारापासुन आपल्या परिवारातील मुलांपासून ते प्रौढांपासून सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज हळदीसह कोमट दूध पिण्यास द्यावे. याशिवाय, मोठ्या व्यक्तींसाठी त्यांच्या आहारात आले, लवंग, काळी मिरी, तुळस इत्यादींचा काढा बनवुन प्यावे. याशिवाय हंगामी फळे, हिरव्या भाज्या, सुकामेवा यांचे सेवन करावे.

पुरेसे पाणी पिणे महत्वाचे

बदलत्या हवामानात आजारी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा. यासाठी भरपूर पाणी प्या, तसेच वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार केलेल्या सूपाचे सेवन करा. याशिवाय तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता.

स्वच्छतेची विशेष काळजी घ्या

बदलत्या वातारणात विषाणूचे संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मुलांना बाहेरून आल्यानंतर, हात-पाय धुण्याची सवय लावा. तसेच बाहेर असल्यावर डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा आणि नेहमी खाण्याआधी हात स्वच्छ करा.

विश्रांती घेणे अत्यंत महत्वाचे

विषाणूसंसर्गाच्या समस्या टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. त्यामुळे शरीराला बळकटी मिळते, याशिवाय तंदुरस्त राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील आवश्यक आहे. झोपेचा अभाव देखील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो आणि संसर्गाचा धोका वाढवतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

———————————————————–