AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी ठरतात तुमच्या नशीबातील सर्वात मोठा अडथळा, आजच उपाय जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरतात, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. आज आपण अशाच काही गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता असते.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी ठरतात तुमच्या नशीबातील सर्वात मोठा अडथळा, आजच उपाय जाणून घ्या
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 8:20 PM
Share

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वास्तुशास्त्राचं खूप महत्त्वच असतं. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर नशीबाची साथ मिळत नाही, एवढंच नाही तर हातात आलेला पैसा देखील टिकत नाही. मात्र तुम्ही जर दररोज वास्तुशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन केलं, तसेच काही सोपे उपाय केले तर वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जेपासून तुमचा बचाव होऊ शकतो. अनेकदा घरात वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये आरोग्यविषयक, मानसिक आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला नशीबाची देखील साथ मिळत नाही, तुमच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे येण्यास सुरुवात होते. दरम्यान हे असं का होतं? आणि त्यावरील उपाय काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या गोष्टी डोक्याजवळ ठेवून झोपू नका – वास्तुशास्त्रानुसार कधीही पैशांचं पाकिट डोक्याजवळ ठेवून झोपू नये, यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे एखादं पुस्तक किंवा वर्तमानपत्र देखील डोक्याजवळ ठेवून झोपू नका, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते, त्याचा परिणाम तुमच्या मानसिक शांतीवर होतो. एवढंच नाही तर घड्याळ, मोबाईल या सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील डोक्याजवळ ठेवून झोपू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

अशा ठिकाणी तुमचं घर कधी असू नये, जिथे तुमच्या अगदी घराच्या समोरच मंदिर असेल, असंही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. तसेच घरात कधीही काटेरी झाडं लावू नयेत, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो. अनेकदा घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच घराचा मुख्य दरवाजा कधीही बाहेरच्या बाजुने उघडू नका, घराचा मुख्य दरवाजाची रचना अशीच ठेवावी की तो आतील बाजूस उघडेल, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...