Diwali Skin Care: दिवाळीत चेहऱ्यावर हवी चंद्रासारखी चमक? घरच्या घरी कच्च्या दुधाने करा फेशियल

Raw Milk Facial: कच्चे दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. दिवाळीच्या आधी तुम्ही त्याच्या मदतीने फेशियल करू शकता. कच्च्या दुधाने फेशियल कसे करावे ते येथे जाणून घ्या.

Diwali Skin Care: दिवाळीत चेहऱ्यावर हवी चंद्रासारखी चमक? घरच्या घरी कच्च्या दुधाने करा फेशियल
| Edited By: | Updated on: Oct 26, 2026 | 2:59 PM

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अशावेळी घराची साफसफाई आणि इतर गोष्टींकडे लक्ष देताना त्वचेकडे दुर्लक्ष होते. शिवाय पार्लरमध्ये जाण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ नसतो. अशावेळी खास सणाला तुमचा चेहरा चंद्रासारखा चमकावा, चेहऱ्यावर ग्लो यावे असे वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता. कच्चं दूध त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानलं जातं. अशा परिस्थितीत तुम्ही कच्च्या दुधाच्या मदतीने फेशियल करू शकता. कच्च्या दुधात लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला आतून चमकण्यास मदत करते. घरच्या घरी कच्च्या दुधाने फेशियल कसे करायचे ते जाणून घेऊया.

असे करा कच्च्या दुधाने फेशियल

Loading...

घरच्या घरी कच्च्या दुधाने फेशियल करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याची गरज नाही. अगदी साध्या ४ स्टेप्समध्ये तुम्ही हे फेशियल करू शकता. चला तर जाणून घ्या कच्च्या दुधाने फेशियल करायच्या स्टेप्स

स्टेप १ – फेशियल करण्‍यासाठी प्रथम तुमचा चेहरा स्वच्छ करा. यासाठी चेहरा नीट धुवून घ्या. नंतर एका भांड्यात एक ते दीड चमचा कच्चे दूध घ्या. त्यात २ चिमूटभर हळद मिक्स करा. नीट मिक्स केल्यानंतर त्यात कॉटन पॅड बुडवा आणि नंतर चेहरा स्वच्छ करा. थोडा वेळ चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर चोळा. आता चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

स्टेप २ – चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्क्रब करा. यासाठी दोन चमचे कच्चे दूध, अर्धा चमचा कॉर्न फ्लोअर आणि एक चमचा तांदळाचे पीठ मिक्स करा. ही पेस्ट जर खूप घट्ट असेल तर त्यात थोडे गुलाब जल टाका. या मिश्रणाने चेहरा स्क्रब करा. काही वेळ सर्कुलर मोशनमध्ये घासून घ्या आणि नंतर ओल्या टॉवेलच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

स्टेप ३ – तिसर्‍या स्टेपसाठी एक चमचा कच्चे दूध घ्या आणि त्यात १ चमचा मध मिक्स करा. नंतर कॉटन पॅड घ्या आणि ते यात बुडवा. आता याने तुमच्या चेहऱ्याला सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. त्यानंतर ओल्या टॉवेलने चेहरा पुसून घ्या.

स्टेप ४ – फेस पॅक बनवण्यासाठी कच्च्या दुधात केळी मिक्स करा. केळी नीट मॅश करून मिक्स करा. नंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. साधारण १० मिनिटे तसाच राहू द्या. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर फेस सीरम लावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us