Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

| Updated on: Jan 22, 2021 | 11:18 AM

जर आपल्याला असे वाटत असेल की, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केवळ फेस सीरम, टोनर आणि मॉइश्चराइझर पुरेसे आहे, तर तसे नाही.

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे...
Follow us on

मुंबई : जर आपल्याला असे वाटत असेल की, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केवळ फेस सीरम, टोनर आणि मॉइश्चराइझर पुरेसे आहे, तर तसे नाही. ‘ब्युटी ऑईल’ हे एक असे उत्पादन आहे, जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. आपण हे तेल शरीरावर आणि चेहऱ्यावर देखील वापरू शकता. बऱ्याचदा बाजारात मिळणारे कोणते तेल विकत घ्यावे यात साम्ब्राम असतो. अशावेळी हे ‘ब्युटी ऑईल’ तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता. आपल्या त्वचेसाठी हे ‘ब्युटी ऑईल’ कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊया…(Skincare routine beauty oil for healthy and glowing skin)

ब्युटी ऑईलचा वापर

– मेकअप करताना फाउंडेशनमध्ये मिसळून आपण चेहऱ्यावर या ;ब्युटी ऑईल’चे काही थेंब लावू शकता. हे तेल लावल्याने तुमचा चेहरा चमकदार राहील.

– मेकअप काढण्यासाठी देखील ब्युटी ऑईलचा वापर करू शकता. याने चेहरा आणि त्वचा स्वच्छ राहील.

– रात्री झोपण्यापूर्वी आपण ब्युटी ऑईलचे काही थेंब वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चराइझ होईल. तसेच त्वचेतील पोषकद्रव्ये टिकून राहतील.

कसे तयार करावे ‘ब्युटी ऑईल’?

घरच्या घरी ‘ब्युटी ऑईल’ तयार करण्यासाठी नारळाचे तेल आणि जोजोबा तेल एका वाटीत घेऊन, त्यात लेव्हेंडर आणि लिंबाच्या इसेन्सचे काही थेंब टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपण आपल्या त्वचेच्या पोत लक्षात घेऊन, हे तेल वापरू शकता (Skincare routine beauty oil for healthy and glowing skin).

सौंदर्य तेलाचे फायदे

– आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये आपण ब्यूटी ऑइलचा वापर करावा, अशी अनेक कारणे आहेत आणि त्याचे अनेक फायदे देखील आहेत.

– ट्रान्ससेपिडर्मल पाण्यामुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी ;ब्युटी ऑईल’ आपल्या त्वचेवर एजंट म्हणून काम करते आणि त्वचेही आर्द्रता टिकवून ठेवते.

– मेकअप आणि स्किनकेयर रुटीन दरम्यान नियमित हे तेल वापरल्याने त्वचा निरोगी राहील आणि नितळ होईल.

– हे ‘ब्युटी ऑइल’ आपल्या चेहऱ्याला इंस्टंट चमक देण्याबरोबरच पोषण देखील देते.

त्वचेच्या आरोग्यासाठी मसाजही महत्त्वाचा

हिवाळ्याच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. आपली व्यस्त जीवनशैली आणि वाढता तणावाचे हे याचे मुख्य कारण देखील असू शकते. कोरोनामुळे ताणतणावाच्या पातळी लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत घर किंवा ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी आपण बर्‍याच वेळा विचार करतो. जास्त ताण घेतल्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेवर देखील दिसून येतो. दिवसभर काम केल्यानंतर चेहऱ्याला हलकी मालिश केल्याने आपल्याला आराम मिळतो. मालिश केल्याने आपले शरीरच नव्हे तर, त्वचेलाही आराम मिळतो. आपण फेस पॅक, ब्युटी ऑईल किंवा फेस मास्क लावून चेहऱ्यावर मसाज करू शकता.

(Skincare routine beauty oil for healthy and glowing skin)

हेही वाचा :