AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात निघणारा हा किडा पाहिला असेलच; तब्बल 75 लाख किमतीला विकला जातो

पावसाळ्यात निघणारा एक किडा तुम्हाला चक्क मालामाल करू शकतो. होय, हा किडी तब्बल 75 लाखांना विकला जातो. एवढंच नाही तर या किड्याला गुड लक घेऊन येणारा दखील म्हटलं जातं. तुम्हाला पण दिसलाय का हा किडा?

पावसाळ्यात निघणारा हा किडा पाहिला असेलच; तब्बल 75 लाख किमतीला विकला जातो
Stag Beetle: 75 Lakh Rupees InsectImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 13, 2025 | 4:07 PM
Share

पावसाळा म्हटलं की गावी घरात आणि अंगणात बऱ्याच प्रकारचे किडे निघतात. एवढंच काय तर शहरातही घरात, बाल्कनीत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे किडे निघतात. काही किडे किंवा किटक हे विषारी असू शकतात. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यासाठी आपण शक्यतो तेवढे सगळे प्रयत्न करतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पावसाळ्यात निघणारा असा एक किडा जो तुम्हाला मालामाल करू शकतो. कारण तो काही सेंटीमीटर असलेला हा एवढासा किडा चक्क लाखो रुपयांमध्ये विकला जातो.

या किड्यात असं काय खास आहे? 

होय हे वाचूम तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. पावसाळ्यात निघणारा स्टॅग बीटल हा एक कीटक आहे ज्याची किंमत तब्बल 75 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पण या किड्यात असं काय खास आहे की तो इतक्या किमतीला विकला जातो आणि लोक ते इतक्या महागड्या किमतीत खरेदी करण्यास तयारही असतात. चला जाणून घेऊयात.

गुड लक देणारा किडा

जगभरात असे लोक आहेत जे स्टॅग बीटल त्यांच्या अद्वितीय स्वरूपामुळे, दुर्मिळतेमुळे आणि नशिबाशी संबंधित विश्वासांमुळे त्याला शोधतात किंवा विकत घेतात. अनेक देशांमध्ये स्टॅग बीटलला शुभ मानले जाते. त्याच्या काही प्रजाती इतक्या दुर्मिळ झाल्या आहेत की लोक त्यासाठी 75 लाखांपर्यंत खर्च करण्यास तयार असतात. असे मानले जाते की हा किडा ज्या माणसाकडे असतो किंवा ज्याला मिळतो त्याचे नशीब उजळते. अचानक संपत्तीलाभ होतो. काही लोक असाही दावा करतात की हा किडा घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. या श्रद्धेमुळे, अनेक श्रीमंत लोक देखील छंद किंवा श्रद्धा म्हणून हा किडा खरेदी करण्यासाठी लाखो खर्च करण्यास तयार असतात. खासकरून जपानमध्ये या किड्याला जास्त महत्त्व आहे. तसेच जपानमध्ये हा किडा अनेकांच्या घरात दिसला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही.

Stag Beetle

औषधी गुणधर्म 

काही आशियाई देशांमध्ये, स्टॅग बीटलचा वापर पारंपारिक औषधांमध्ये देखील केला जातो. असे मानले जाते की त्याच्या शरीरातून काढलेल्या घटकांनी काही आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. जरी याचे वैज्ञानिक पुरावे अजूनही कमी असले तरी, बाजारात त्याची औषधी मागणी सतत वाढत आहे. या किड्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे भव्य आणि मोठे स्किन. नर स्टॅग बीटलचे हे जबडे अगदी हरणाच्या शिंगांसारखे दिसतात, म्हणूनच त्याला डीअर बीटल असेही म्हणतात. दुसरीकडे, मादी स्टॅग बीटलचे जबडे लहान असतात.

हा किडा 3 ते 7 वर्षे जगू शकतो

यासोबतच, स्टॅग बीटल जैविक विघटन म्हणजेच मृत लाकूड आणि पानांना कुजण्यास मदत करते. यामुळे मातीमध्ये पोषक तत्वे तयार होतात आणि जंगलांचे आरोग्य संतुलित राहते. स्टॅग बीटलचे जीवनचक्र देखील खूप मनोरंजक असते. त्यांचे बहुतेक आयुष्य जमिनीखाली जाते, जिथे ते लाकूड खात सुरंग बनवतात. स्टॅग बीटल 3 ते 7 वर्षे जगू शकतात, परंतु यातील बहुतेक वेळ ते जमिनीतच असतात. आणि पावसाळ्यात बाहेर येतात.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?