तुमच्या दिवसाची सुरूवात करा अक्रोडांनी, जाणून घ्या आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

अक्रोड पोषक तत्वांनी समृद्ध असतात. ते शरीराची सामान्य कार्यप्रणाली टिकवून ठेवण्यास मदत करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण दररोज मूठभर अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

तुमच्या दिवसाची सुरूवात करा अक्रोडांनी, जाणून घ्या आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 9:13 PM

आजकाल प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. अशातच काही लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की संतुलित आहार घेताना कोणत्या पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. तर अक्रोड हे एक सुके फळ आहे. ज्याला सुपरफूड मानले जाते. त्याचे नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. म्हणूनच अनेक आरोग्य तज्ञ संतुलित आहारात अक्रोडाचा समावेश करण्याची शिफारस करतात. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिने, फायबर, आरोग्यदायी फॅट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज आणि अनेक पॉवरफूल अँटीऑक्सिडंट्स असतात. ही सर्व पोषक तत्वे शरीराच्या सामान्य कार्यासाठी अत्यावश्यक मानली जातात. यासाठी अक्रोडचा आपल्या रोजच्या आहारात सहज समावेश करता येतो. चला, दररोज सकाळी मूठभर अक्रोड खाण्याचे फायदे, ते खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ, तसेच ते खाताना कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल जाणून घेऊयात.

दररोज सकाळी मूठभर अक्रोड खाल्ल्याने हे 5 प्रमुख फायदे मिळू शकतात

हृदयाच्या आरोग्य चांगले राहते

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, आरोग्यदायी फॅट आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक हृदयाचे आरोग्य सामान्य राखण्यास मदत करू शकतात. माफक प्रमाणात अक्रोड खाणे हा निरोगी आहाराचा एक भाग मानला जातो आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते.

मेंदूच्या आरोग्यासाठी मदत करते

अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटिऑक्सिडंट्स मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. नियमितपणे आणि माफक प्रमाणात अक्रोड खाणे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. म्हणूनच अक्रोडला मेंदूसाठी अनुकूल पदार्थ म्हणूनही ओळखले जाते.

पचनक्रिया चांगली राखण्यास मदत करते

अक्रोडमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. नियमितपणे आणि योग्य प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात मदत करते

अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट यांचे योग्य संतुलन असते. ही पोषक तत्वे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे भूक कमी लागते. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत त्यांचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवणे

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन बी6 यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. ही पोषक तत्वे शरीराची सामान्य कार्यप्रणाली टिकवून ठेवण्यास, ऊर्जा कायम राखण्यास आणि सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

अक्रोड खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती आहे?

अक्रोड सकाळी खाणे सर्वोत्तम असते. बरेच लोकं ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खातात. अक्रोडांचा समावेश नाश्त्यामध्ये किंवा जेवणांच्या मध्ये एक आरोग्यदायी नाश्ता म्हणून केला जाऊ शकतो.

अक्रोड दही, ओट्स, स्मूदी किंवा सॅलडमध्ये मिक्स करूनही खाल्ले जाऊ शकतात. दररोज मूठभर म्हणजे सुमारे 25-30 ग्रॅम) अक्रोड खाणे साधारणपणे पुरेसे मानले जाते, परंतु हे प्रमाण व्यक्तीच्या गरजा आणि आरोग्यानुसार बदलू शकते.

अक्रोड खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

अक्रोड नेहमी प्रमाणातच खावेत, कारण ते कॅलरीचा चांगला स्रोत आहेत. जर तुम्हाला सुकामेव्याची ॲलर्जी असेल तर अक्रोड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून अक्रोडाचे सेवन करा. जर तुम्हाला एखादी विशिष्ट वैद्यकीय समस्या असेल किंवा तुम्ही विशिष्ट आहाराचे पालन करत असाल, तर नियमितपणे अक्रोडाचे सेवन करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे उत्तम राहील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us