Travel | पुण्याच्या शिवनेरी ट्रेकर्सची गिर्यारोहण मोहीम, सर केला नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत असणारा ‘तैलबैला’

अत्यंत अवघड व कठिण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला जुन्नर तालुक्यातील शिवनेरी ट्रेकर्सच्या साहसी तरूणांनी नुकताच सर केला.

Travel | पुण्याच्या शिवनेरी ट्रेकर्सची गिर्यारोहण मोहीम, सर केला नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत असणारा ‘तैलबैला’
तैलबैला किल्याची समुद्र सपाटीपासुन उंची 3 हजार 332 फुट इतकी आहे.
| Updated on: Feb 02, 2021 | 4:52 PM

पुणे : अत्यंत अवघड व कठिण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला जुन्नर तालुक्यातील शिवनेरी ट्रेकर्सच्या साहसी तरूणांनी नुकताच सर केला. केवळ शेतीच्या मातीशी नाळ जोडलेली असताना देखील गिर्यारोहणाची आवड असलेल्या जुन्नर तालुक्यातील काही निवडक तरूणांनी गिर्यारोहणाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन आपली आवड जोपासत आजवर अनेक गड किल्ले सर केले आहेत (Tailbaila trekking  by Shivneri  Trekkers group from pune).

अनिल काशिद, संतोष डुकरे, ओंकार मोरे, विकास सहाणे, अंकित पठारे यांनी देखील या ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता.

तैलबैला किल्याची समुद्र सपाटीपासुन उंची 3 हजार 332 फुट इतकी आहे. तैलबैला किल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग असून, पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेत हा किल्ला स्थित आहे. सह्याद्रीची रचना आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हारसातून या डोंगरांची निर्मिती झालेली आहे. या लाव्हारसाचे थर थंड होताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर. तैलबैलाची भिंत साधारणपणे 3310 फुट उंच असून उत्तर-दक्षिण अशी पसरलेली आहे.

या डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी गरजेचे सामान व गिर्यारोहणाच्या तंत्राची माहीती असणे आवश्यक आहे. या दोन्ही डोंगरांच्या गिर्यारोहणाचे नेतृत्व हिवरे तर्फे नारायणगाव येथील निलेश खोकराळे व किशोर साळवी यांनी केले. अनिल काशिद, संतोष डुकरे, ओंकार मोरे, विकास सहाणे, अंकित पठारे यांनी देखील या ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता.

‘तैलबैला’चा इतिहास

तैल्बैलाचे पूर्वीचे नाव ‘बैलतळ’ असे होते. मात्र, हा किल्ला असल्याचा पुरावा अद्याप कुठेही सापडलेला नाही. आजकाल इन्टरनेटवर सर्च केले असता याचा उल्लेख किल्ला म्हणून दिसतो. मात्र, हा किल्ला नसून, केवळ टेहाळणी करण्याचे एक ठिकाण आहे. या डाईक भिंतीवर चढाई करताना एक सुंदर आणि विलक्षण थराराचा अनुभव घेता येतो (Tailbaila trekking  by Shivneri  Trekkers group from pune).

प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठेपर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली आहे. तैलबैला हा जुन्या काळातील कोकणातून सवाष्णी घाटावरून येणाऱ्या पायवाटेवरील वॉच टॉवर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक अवघड मार्गाचा फायदा घेऊन वर लपून बसत. त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुरुंग लावून मधील पायऱ्या उद्‌ध्वस्त केल्या आहेत.

कसे जाल?

तैलबैलाच्या पायथ्याशी असणार्‍या तैलबैला गावात जाण्यासाठी प्रथम  लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे अ‍ॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. कोरीगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठशहापूर गावापासून फाटा अंदाजे 8.5 किमी अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणार्‍या रस्त्यावर ‘तैलबैला’ असा फलक लावलेला आहे. या फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण 3 किमी अंतरावर आहे. येथून ट्रेकिंग करत चढाई करता येते.

(Tailbaila trekking  by Shivneri  Trekkers group from pune)

हेही वाचा :