
घरात लहान मुले असली की घरात खेळीमेळीचे वातावरण असते. लहान मुलांसोबत आपण देखील कधी लहान होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही. पण लहान मुलं ही वेळेबरोबर मोठी होणार असतात, हे पालक म्हणून आपण विसरून जातो. अनेक वेळा काही गोष्टी आपण मुलांना सांगायच्या टाळतो.
वयाची 12 वर्षे उलटल्यानंतर मुलांचा किशोरवयीन प्रवास सुरू होतो. बारा वर्षांपर्यंतचे वय मुलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. या आधी शिकलेल्या गोष्टी त्यांना त्यांचे पुढील विचार तयार करण्यात मदत करतात. अशा परिस्थितीत काही गोष्टी आहेत ज्या मुलांना बारा वर्षांपूर्वी शिकवल्या पाहिजेत. चला तर मग प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना बारा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजे, हे जाणून घेऊया.
इतरांचा आदर करणे : मुलांना इतरांचा आदर करायला शिकवा. मग ते मोठे असोत किंवा लहान. त्यांना समजावून सांगा की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि त्यांची स्वतःची मते आहेत.
सकारात्मक विचार : मुलांना हे समजावून सांगा की सकारात्मक विचाराने ते कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मुलांना सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहित करा.
अपयशातून शिकणे : अपयश हा जीवनाचा एक भाग आहे हे मुलांना समजावून सांगा. त्यांनी अपयशाने निराश होऊ नये तर त्यातून शिकून पुढे जावे.
आत्मविश्वास : मुलांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला सांगा. मुलांना लहान ध्येय ठेवण्यासाठी आणि ते गाठण्यासाठी प्रोत्साहित करा. जीवनातील आव्हानांचा सामना करण्यास आत्मविश्वास सक्षम करतो हे मुलांना पटवून द्या. मुलांना ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाही ते समजावून सांगा.
जबाबदारीचे जाणीव करून द्या : मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्या त्यांना घरातील छोट्या मोठ्या कामांमध्ये सहभागी करून घ्या. ज्यामुळे ते जबाबदारी घ्यायला शिकतील.