‘या’ 5 उपायांनी कढीपत्ता फ्रिजमध्ये राहील महिनोनमहिने ताजा, या टिप्स करा फॉलो

जेवण बनवताना पदार्थांमध्ये कढीपत्त्याची फोडणी दिली की त्याची चव आणि सुगंध दोन्ही वाढते. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आपल्यापैकी अनेकजण असे आहेत जे बाजारातून जास्त कढीपत्ता विकत घेतात. पण काही दिवसातच कढीपत्ता सुकतो. तर आजच्या लेखात आपण कढीपत्ता आठवड्याभरापेक्षा जास्त दिवस ताजा ठेवण्याच्या या योग्य पद्धती जाणून घेऊयात.

या 5 उपायांनी कढीपत्ता फ्रिजमध्ये राहील महिनोनमहिने ताजा, या टिप्स करा फॉलो
curry-leaves
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: May 19, 2026 | 1:16 PM

कढीपत्ता अन्नाची चव आणि सुगंध वाढवतो. यासाठीच पदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण प्रत्येकजण फोडणीत कढीपत्ता वापरतो. अनेकदा बाजारातून आपण जास्त कढीपत्ता विकत घेतो आणि तो फ्रिजमध्ये ठेवतो. पण दोन ते तीन दिवसातच कढीपत्ता सुकतो आणि त्याची चव बिघडते. अशातच फोडणीत कढीपत्ता वापरला तरी त्याची विशेष चव लागता नाही. मग असा कढीपत्ता आपण शक्यतो फेकूनच देतो. पण तोच कढीपत्ता हिरवागार असला की पदार्थात वापरायला ही छान वाटतो. मात्र एकदा की कढीपत्ता काळा पडला की तो वापरण्या योग्य राहत नाही. अशावेळेस कढीपत्ता ताजा राहण्यासाठी आणि स्वयंपाकात वापरता यावा यासाठी योग्य प्रकारे साठवणे महत्वाचं आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण काही टिप्सनुसार तुम्ही कढीपत्ता महिनोनमहिने कसा ताजा आणि हिरवा राहील ते जाणून घेऊयात.

कढीपत्ता साठवण्याची योग्य पद्धत

1.तुम्हाला जर कढीपत्ता फ्रिजमध्ये ठेवायचा असेल, तर प्रथम तो पाण्याने स्वच्छ धुवा. वाळलेली किंवा पिवळी पडलेली पाने काढून टाका. आता एक हवाबंद डबा किंवा झिपलॉक बॅग घ्या आणि त्यात एक टिश्यू पेपर ठेवा आणि त्यात कढीपत्ता ठेवा असे एकावर एक लेअर कर कढीपत्ता ठेवा आणि त्यावर टिश्यू पेपर ठेवा. यामुळे ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. तुम्ही जर अशा प्रकारे कढीपत्ता साठवल्यास, तो 2 ते 3 आठवडे सहज ताजा राहू शकतो.

2. सर्वप्रथम कढीपत्ता पाण्याने स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने तो कोरडा करा. हवे असल्यास तो कागदावर किंवा कापडावर पसरवून ठेवा. यामुळे पाणी सुकेल. आर्द्रतेमुळे पाने लवकर सडू शकतात. आता, तो एका चांगल्या प्रतीच्या, हवाबंद डब्यात साठवून ठेवा.

3. तुम्हाला कढीपत्ता जास्त काळ फ्रीजरमध्ये साठवायचा असेल, तर तो धुवून कोरडा करा. त्याच्या लहान पुड्या बनवा. त्या हवाबंद पिशव्यांमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये साठवा. यामुळे तुम्हाला तो दोन ते तीन महिने वापरता येईल.

4. तुम्ही कढीपत्ता उन्हात पूर्णपणे वाळवून त्याची पूडही बनवू शकता. ही पूड सांबार, ग्रेव्हीचे पदार्थ, फ्राईड राईस, चटण्या इत्यादींमध्ये वापरल्यास चविष्ट लागते. पाने सुकल्यावर आणि कुरकुरीत झाल्यावर, ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. ही पूड एका हवाबंद बरणीत साठवून ठेवा.

काय करू नये?

ओली पाने फ्रिजमध्ये ठेवू नका.

कढीपत्त्याची पाने फ्रिजमध्ये उघडी ठेवल्यास ती लवकर सुकतात.

अत्यंत थंड ठिकाणी ठेवल्यास पाने काळी पडू शकतात.

प्लास्टिकच्या पिशवीत ओलावा अडकल्यास बुरशी येऊ शकते.

कढीपत्त्याची पाने किती दिवस ताजे राहतील?

टिश्यू पेपर आणि हवाबंद डब्यात ठेवल्यास ते दोन ते तीन आठवडे ताजे राहतील.

साधारणपणे कढीपत्ता फ्रिजमध्ये पाच ते सात दिवस ताजे राहतात.

सुक्या कढीपत्त्याची पूड सहा महिन्यांपर्यंत ताजी राहू शकते.

देठ काढून साठवण्याऐवजी पाने अख्ख्या जुड्यांमध्ये साठवा. यामुळे पाने अनेक दिवस ओलसर राहण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us