AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर

बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्… चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर

| Updated on: May 19, 2026 | 11:57 AM
Share

यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणात आता सीबीआयला आणखी यश मिळाले आहे. सीबीआयने आता या प्रकरणात बायोलॉजीच्या प्रोफेसर मनीषा मांढरे यांना अटक केली आहे. नीट पेपर फूट प्रकरणाचे धागेदोरे आता प्रोफेसर आणि कोचिंग सेंटरशी जोडले जात असल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंधारे यांची पोलिस यंत्रणा कसून चौकशी करत आहे. यामध्ये एका पाठोपाठ एक अपडेट्स समोर येत आहेत.

या प्रकरणात अटक केलेल्या मनीषा वाघमारे यांच्या चौकशीतून मनीषा मांढरे यांचे नाव समोर आले. जेव्हा तपासाची व्याप्ती वाढली तसे मनीषा मांढरे यांचे नाव समोर आले. दोघींचा या प्रकरणात मोठा रोल आहे. सीबीआय आता मनीषा अंधारे यांच्या बँक खात्यांची आणि फोन कॉल्सचे डिटेल्स शोधून काढत आहेत. दरम्यान मंधारेंच्या एका महत्त्वाच्या जबाबने पोलिसांनाही चकित केलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, मांढरे हिच्या चौकशीत तांत्रिक अडचण येत असल्याचं समोर आलं आहे. मात्र पोलिसांनी चौकस राहून बरेचसे पुरावे मिळवले आहेत. मनीषा मंधारे या २५ वर्षांपासून एकच विषय शिकवत होत्या. प्रश्न फोडताना त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. स्मरणशक्तीचा वापर करून मोठा घोळ केला.

मनीषा गुरुनाथ मांढरे या महाराष्ट्रातील पुण्याच्या रहिवासी आहेत. त्या सिनियर बॉटनी प्राध्यापक आहेत. त्या एनटीएच्या वतीने नीट-यूजी 2024 परीक्षा प्रक्रियेत एक एक्सपर्ट म्हणून अधिकृतपणे सामील होत्या. एनटीए एक्सपर्ट पॅनलमध्ये असल्याने त्यांना बॉटनी आणि झुलॉजीच्या प्रश्न पत्रिका सहज मिळाल्या.

Published on: May 19, 2026 11:57 AM
Follow Us