Health Aging | घरातील वृद्धांना ‘या’ पदार्थांपासून ठेवा दूर, अन्यथा आरोग्याला होईल नुकसान!

| Updated on: Feb 15, 2021 | 12:59 PM

वाढत्या वयानुसार आपली रोगप्रतिकार शक्ती आणि स्नायू कमकुवत होऊ लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती वयाच्या 50व्या वर्षापर्यंत पोहचते, तेव्हा त्यांच्या आहारावर बरेच लक्ष केंद्रित केले जाते.

Health Aging | घरातील वृद्धांना ‘या’ पदार्थांपासून ठेवा दूर, अन्यथा आरोग्याला होईल नुकसान!
खाद्य पदार्थ
Follow us on

मुंबई : वाढत्या वयानुसार आपली रोगप्रतिकार शक्ती आणि स्नायू कमकुवत होऊ लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती वयाच्या 50व्या वर्षापर्यंत पोहचते, तेव्हा त्यांच्या आहारावर बरेच लक्ष केंद्रित केले जाते. अशक्त शरीरावर बर्‍याच गोष्टींचा योग्य परिणाम होत नाही, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. चला तर, अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या वृद्धत्वात कटाक्षाने टाळल्या पाहिजेत (These food should be avoid after age of 50).

द्राक्षे

वाढत्या वयात रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश आणि चिंता यासारखे काही रोग होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत, आपल्या आहाराचा परिणाम आपल्या औषधांवर देखील होतो. आपण कोणतेही औषध घेत असल्यास, द्राक्ष खाणे किंवा त्याचा रस पिणे टाळा. यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो. त्याऐवजी आपल्या आहारात लिंबाचे प्रमाण वाढवा.

कच्च्या भाज्या

कच्च्या भाज्या जीवनसत्त्वे आणि फायबरयुक्त असतात आणि बहुतेक लोक हे सलाड म्हणून खातात. तथापि, जर आपले शरीर आणि दात कमकुवत होत असतील, तर आपण हे खाणे टाळावे. भाज्या पूर्ण शिजवा आणि मगच खा. आपण गाजर, भोपळा किंवा बीटचा रस बनवून पिऊ शकता. यासह, आपल्याला शरीराला सर्व पोषकद्रव्ये मिळतील.

कच्ची मोड आलेली कडधान्ये

स्प्राउट्समध्ये व्हिटामिन बी आणि इतर पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. कच्चे अंकुरलेले कडधान्य वृद्ध किंवा वाढत्या वयाच्या लोकांच्या कमकुवत रोगप्रतिकारक प्रणालींसाठी आरोग्यदायी मानले जात नाही. कच्च्या कडधान्यामुळे जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे बरेच रोग उद्भवू शकतात. म्हणूनच, कच्च्या कडधान्याऐवजी ते उकडून खाणे आरोग्यासाठी योग्य असेल (These food should be avoid after age of 50).

जास्त मीठ खाणे

जर तुमचे वय 51 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही जास्त मीठ खाणे टाळावे. या वयात, दररोज 2,300 मिलीग्राम सोडियम घेण्याचा सल्ला दिला जातो. जास्त मीठ खाल्ल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो आणि यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. सोडियमचे सेवन कमी करण्यासाठी प्रक्रिया केलेले अन्न आणि बॉक्सपॅक स्नॅक्स खाणे टाळा.

गॅस उत्पन्न करणाऱ्या भाज्या

वाढत्या वयात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर आणि राजमा या भाज्यांना पचण्यास वेळ लागतो ज्यामुळे पोटात गॅस तयार होण्यास सुरुवात होते. सर्व पालेभाज्यांमध्ये सी, ए आणि के जीवनसत्त्वे भरलेले असतात. तसेच त्यांच्यात कॅलरी देखील कमी आहे. म्हणून या भाज्यापण मर्यादित प्रमाणात खा. आठवड्यातून एकदा राजमा किंवा चणा खा.

अल्कोहोल

या काळात अल्कोहोलचे सेवन अगदी कमी प्रमाणात कमी केले जावे. त्रासदायक झोपेबरोबरच अल्कोहोल रक्तदाब देखील वाढवते. मधुमेह रूग्णांमध्ये अल्कोहोल सेवनामुळे हायपोग्लेसीमिया होऊ शकतो. याशिवाय अल्कोहोलमुळे शरीरात औषधांचा कोणताही परिणाम होत नाही.

कॅफिन

या वयात कॅफिनचे सेवन कमी केले पाहिजे. चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणाऱ्या उत्तेजक द्रव्यामुळे काही लोकांना अस्वस्थ आणि चिडचिडे वाटू लागते. चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य हृदय गती देखील वाढवू शकतात. जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला झोपेची समस्या देखील होऊ शकते. कॅफिनऐवजी, हर्बल चहा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा.

(These food should be avoid after age of 50)

हेही वाचा :