AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Care | अचानक वाढलाय थंडीचा पारा, अशा प्रकारे घरातील वृद्धांची तब्येत सांभाळा!

गेल्या काही दिवसांत तापमानाच्या पाऱ्यात जोरादार घसरण झाली आहे. त्यामुळे, थंडीत अचानक वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, सर्वात जास्त त्रास आजारी लोक आणि वृद्धांना होतो.

Winter Care | अचानक वाढलाय थंडीचा पारा, अशा प्रकारे घरातील वृद्धांची तब्येत सांभाळा!
| Updated on: Dec 16, 2020 | 3:08 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांत तापमानाच्या पाऱ्यात जोरादार घसरण झाली आहे. त्यामुळे, थंडीत अचानक वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, सर्वात जास्त त्रास आजारी लोक आणि वृद्धांना होतो. थोडीसा निष्काळजीपणाही आरोग्यावर ताण आणू शकतो आणि समस्या अधिक वाढवू शकतो. आरोग्यासंबंधित काही बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊन आपण संपूर्ण हिवाळ्यामध्ये स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता (Winter care tips for old and ill persons to avoid health issues).

सांधे दुखी झाल्यास

40 वर्षांवरील लोकांना या दिवसांत सांधेदुखीची समस्या उद्भवते. थंडी वाढल्यामुळे देखील ही समस्या वाढू शकते. अशा लोकांनी या हंगामात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ही समस्या दूर करण्यासाठी, दररोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसूण खा. याशिवाय तीळाच्या तेलात जायफळ किसून घालून, ते तापवून घ्या. हे तेल थंड झाल्यावर गाळून एक बाटलीत अथवा डब्यात भरा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे तेल थोडेसे कोमट करून सांध्यावर मालिश करा आणि गरम पट्टी बांधा. या तेलाने सांधे दुखीपासून आराम मिळेल.

सर्दी खोकला टाळण्यासाठी

थंडीच्या दिवसांत सर्दी-खोकला टाळण्यासाठी कपालभाती व अनुलोम विलोम ये योगा प्रकार दररोज करावे. संपूर्ण हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कोमट पाणी प्यावे. याशिवाय आळशी, अक्रोड आणि बदाम या पदार्थांचे सेवन करावे. तसेच, बाहेर पडताना शक्यतो गरम कपडे घालावे (Winter care tips for old and ill persons to avoid health issues).

दम्याचे रुग्ण असल्यास

आपल्याला दम्याचा त्रास असल्यास हिवाळ्याच्या दिवसांत तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणाने वागू नका. यामुळे तुमची समस्या वाढू शकते. दम्याच्या रुग्णांनी सकाळच्या वेळी घराबाहेर जाऊ नये.थोडेसे ऊन पडल्यावर घराबाहेर जावे. आवश्यक असल्यास, डोक्यापासून पायापर्यंत उबदार कपड्यांनी स्वत:च्या शरीराला व्यवस्थित झाका. यामुळे थंडी लागणार नाही. आपल्याबरोबर इनहेलर नेहमी सोबत ठेवा. तसेच, शरीराला आतून उष्णता देणारे पदार्थ आहारात समाविष्ट करा.

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास

उच्च रक्तदाबाच्या अर्थात हाय बीपीच्या समस्यने ग्रासित असलेल्या लोकांनी या काळात खूप सतर्क राहण्याची गरज आहे. हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा त्रास होण्याची भीतीही जास्त असते. हाय बीपी रुग्णांनी या काळात आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. तेलकट आणि मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे टाळावे.

(Winter care tips for old and ill persons to avoid health issues)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.