
खाद्य पदार्थ असो किंवा औषधे म्हटलं की त्यांना एक्सपायरी डेट आलीच. कारण त्या तारखेनंतर त्या वस्तू वापरणे म्हणजे जीवाशी खेळंच. पण तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरातील काही वस्तूंना एक्सपायरी डेटच नसते. त्या वस्तू किंवा अन्नपदार्थ तुम्ही वर्षानुवर्षे वापरू शकता. फक्त त्यांची साठवण्याची योग्य पद्धत माहित हवी. चला जाणून घेऊयात त्या कोणत्या वस्तू आहे त्या?
स्वयंपाकघरात असलेले हे अन्नपदार्थ वर्षानुवर्षे खराब होत नाहीत.
स्वयंपाकघरात असलेले काही अन्नपदार्थ वर्षानुवर्षे खराब होत नाहीत. तुम्हीही या गोष्टी फेकून देण्याची चूक करता का? चला अशा काही अन्नपदार्थांबद्दल माहिती घेऊया, ज्यांची कोणतीही एक्सपायरी डेट नसते. तुम्ही या गोष्टी अनेक वर्षे वापरू शकता. याशिवाय, तुम्हाला या गोष्टी कशा साठवायच्या हे देखील माहित असले पाहिजे.
तांदूळ
तुम्हाला माहिती आहे का तांदळाची मुदत संपण्याची तारीख म्हणजे एक्सपायरी डेट नसते. ते तुम्ही कितीही काळ वापरू शकता फक्त ते खराब होऊ नये म्हणून तुम्हाला काही छोट्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. तांदूळ साठवण्यासाठी हवाबंद कंटेनर वापरावेत. तांदूळ ओलाव्यापासून दूर ठेवावा. त्यात किड लागू नये याची काळजी घ्यावी. बसं, यानंतर तुम्ही वर्षानुवर्षे हा तांदूळ वापरू शकता.
साखर आणि मीठ
साखर आणि मीठ देखील वर्षानुवर्षे वापरले जाऊ शकते. कारण या दोन्ही गोष्टी खराब होत नाहीत. या दोन्ही गोष्टी खराब होण्यापासून वाचवण्यासाठी, तुम्ही त्या हवाबंद डब्यात साठवल्या पाहिजेत. याशिवाय, त्या वापरण्यासाठी तुम्ही कोरड्या चमच्याचा वापर करावा. जर तुम्ही त्यांना पाणी किंवा ओलावापासून वाचवू शकलात, तर या दोन्ही गोष्टी अनेक वर्षे खराब होणार नाहीत.
सोया सॉस वापरता येईल
स्वयंपाकघरात ठेवलेला सोया सॉस देखील अनेक वर्षे वापरता येतो. सोया सॉसमध्ये सोडियमचे प्रमाण चांगले असते, जे ते खराब होण्यापासून रोखते. सोया सॉस साठवण्यासाठी तुम्ही काचेच्या बाटलीचा वापर करू शकता. थंड आणि कमी प्रकाशाच्या ठिकाणी सोया सॉस साठवून त्याचे शेल्फ लाइफ वाढवता येते.
व्हिनेगर
व्हिनेगर देखील लवकर खराब होत नाही. ते बराच काळ वापरता येतं. व्हिनेगर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता आणि बराच काळ वापरू शकता.
(डिस्क्लेमर: पण कधी जर या पदार्थांमधून वास येत असेल किंवा अळी होणे सारख्या काही समस्या असतील तर ते खाणे टाळावे)