उन्हाळ्यातही पाहिजे तजेलदार त्वचा? मग ‘हे’ नैसर्गिक उपाय नक्की ट्राय करा

| Updated on: Mar 30, 2021 | 10:01 AM

आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये आपण वापरतो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो.

उन्हाळ्यातही पाहिजे तजेलदार त्वचा? मग हे नैसर्गिक उपाय नक्की ट्राय करा
टोमॅटो
Follow us on

मुंबई : आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये आपण वापरतो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील ते उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. त्वचेला टोमॅटो लावण्याचे अनेक फायदे आहेत. दररोज केवळ 15 मिनिटांसाठी आपल्या त्वचेवर टोमॅटोचा रस लावला तर त्वचा अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (Tomatoes are beneficial for the skin)

-दोन चमचे टोमॅटोचा रस

-एक चमचे काकडीचा रस

हे दोन्ही एकत्र करा आणि चेहऱ्याला आणि पंधरा मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होईल. सनबर्नच्या समस्येवर मात करण्यासाठी टोमॅटोचे तुकडे घ्या आणि ते तोंडावर चोळा. कमीतकमी 15 मिनिटे चेहऱ्यावर टोमॅटो चोळा यामुळे चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल.

टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. व्हिटामिन एची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, जे कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.

संबंधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Tomatoes are beneficial for the skin)