Special Story | ‘वाड्यांचे शहर’ पुणे, फिरण्याचा प्लॅन करताय तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

| Updated on: Jan 09, 2021 | 1:36 PM

विद्येचं माहेर घर असणारं पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत.

Special Story | ‘वाड्यांचे शहर’ पुणे, फिरण्याचा प्लॅन करताय तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!
Follow us on

मुंबई : विद्येचं माहेर घर असणारं पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक वीकेंडला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून अगदीच जवळ असल्याने केवळ पुण्यातीलच नव्हे तर, मुंबईतील लोकही शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्याच्या योजना करतात. पुणे शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. ‘वाड्यांचे शहर’ असणाऱ्या पुण्याला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तिथल्या वाड्यांना नक्की भेट दिली पाहिजे (Top Places to visit in pune).

पुणे शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते. शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही थंड हवेची ठिकाणं आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही ‘पिकनिक’साठी नक्कीच जाऊ शकता. त्यातही पुण्यात जाऊन तिथले वाडे पाहणे म्हणजे पर्वणीच असते.

शनिवार वाडा

शनिवार वाडा म्हणजे पुणे शहरातील जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू. शनिवार वाडा हा पेशवेकाळात बांधण्यात आला होता. याच ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736मध्ये इथे लाकडी राजवाडा बांधला होता. त्याकाळी हा वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. मात्र, इंग्रजांनी या वाडा हिसकावून घेतला आणि रातोरात आग लावून हा वाडा जाळून टाकला. आता या वास्तूंमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत. वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग आजूनही कायम आहे. हा वाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. नाममात्र शुल्क देऊन शनिवार वाडा बघता येतो.

आगा खान पॅलेस

गांधी मेमोरिअल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस हा खास इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी, महादेव भाई यांच्यासाठी तुरूंग म्हणून करण्यात आला होता. महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला होता, असे म्हटले जाते. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे (Top Places to visit in pune).

लाल महल

पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्य हिसकावू पाहणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात छाटली होती. आता पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.

शिंद्यांची छत्री

शिंद्यांची छत्री हे पुण्यातील वानवडी येथील एक स्मारक आहे. मराठा साम्राज्यातील मातब्बर सरदार महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे. या वास्तूवर राजस्थानी शैलीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. पुण्यात गेल्यावर या ऐतिहासिक वास्तूला जरूर भेट दिली पाहिजे.

विश्रामबाग वाडा

विश्रामबाग वाडा हा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव यांना विश्रामबागेत राहणं पसंत होते. आता पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे.

(Top Places to visit in pune)

हेही वाचा :