आता तुमचंही साउथ कोरिया फिरायचं स्वप्न होणार पूर्ण, कसं जाणून घ्या

अनेक लोक साउथ कोरियाला के-पॉप आणि के-ड्रामा यांसारख्या मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून ओळखतात. पण, साउथ कोरिया के-पॉप आणि के-ड्रामा यांपर्यंतच मर्यादित नाही. येथेच्या आकर्षक शहरां आणि नैसर्गिक सौंदर्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. जर तुम्हाला या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्याची इच्छा असेल, तर हा लेख एकदा नक्की वाचा.

आता तुमचंही साउथ कोरिया फिरायचं स्वप्न होणार पूर्ण, कसं जाणून घ्या
south korea
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 08, 2025 | 3:36 PM

यंदाच्या सुट्टीत तुम्ही सुद्धा भारताबाहेरील देश फिरण्याचे स्वप्न पाहात आहात. तर तुमचे हे स्वप्न लवकरच पुर्ण होईल. कारण आयआरसीटीसी तुमच्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन आले आहे. ज्यामध्ये तुम्ही साउथ कोरिया हा सुंदर देश एक्सप्लोर करता येणार आहे. साउथ कोरिया हा एक ऐतिहासिक देश आहे, ज्याचा इतिहास संघर्षमय असून येथील संस्कृती खूप जवळून पाहता येणार आहे. आजच्या घडीला हा देश जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेमध्ये गणला जातोय आणि गेल्या काही वर्षात या देशाच्या मनोरंजन क्षेत्रानेही संपुर्ण जगभरात स्वत:ची एक ओळख निर्माण करून वेड लावलेले आहे

आयआरसीटीसी साउथ कोरिया टूर पॅकेज :

पॅकेज नाव : Fascinating South Korea

पॅकेज कोड: SBO18

प्रवासाची तारीख: 3 मे 2025

कालावधी: 7 रात्र आणि 8 दिवस

या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला साउथ कोरिया इत्यादी 5 सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करण्याची संधी मिळेल. आयआरसीटीसी तुम्हाला सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करेल, जसे की हॉटेल, जेवण, स्थानिक ट्रांसपोर्ट आणि सर्व प्रमुख आकर्षक स्थळांची सैर.

पॅकेजच्या किंमती

एकटे प्रवास करणाऱ्यांसाठी: 2,65,000 रुपये

कपल्ससाठी: 2,19,000 रुपये प्रति व्यक्ती

ग्रुपसाठी (तीन किंवा जास्त व्यक्ती): 2,15,000 रुपये प्रति व्यक्ती

साउथ कोरियाची 5 सुंदर ठिकाणे

1. सियोल (Seoul): सियोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे, जेथे आधुनिकता आणि पारंपारिकतेचा अप्रतिम संगम पाहता येतो. गंगनाम, एन-टॉवर, आणि शॉपिंगसाठी भव्य मॉल्स तुम्हाला येथे पाहता येतील.

2. बुसान (Busan): बुसान हे दक्षिण कोरियाचे दुसरे मोठे शहर आहे, जे समुद्रकिनाऱ्यांच्या सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हॅंडोंग बीच, गवांगली बीच, आणि बुसान टॉवर हे तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील.

3. ग्योंग्जू (Gyeongju): ग्योंग्जू हे दक्षिण कोरियाचे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. ग्योंग्जू या शहराला दक्षिण कोरियाच्या संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. येथे प्राचीन बौद्ध मंदिरे, राजा सिकृच्छांच्या समाधी स्थळे आणि ग्योंग्जू राष्ट्रीय उद्यान आहे, जे तुम्हाला दक्षिण कोरियाचा इतिहास दर्शवतील.

4. जेजू आयलंड (Jeju Island): जेजू आयलंड हे साउथ कोरियाचे स्वर्ग आहे. येथील हनोक व्हिलेज, व्हॉल्कॅनिक लँडस्केप्स, आणि आकर्षक धबधबे तुमचे मनमोहक करतील.

5. इन्शन (Incheon): इन्शन सियोलच्या जवळ असलेले एक आधुनिक शहर आहे, जे उत्कृष्ट बंदर, आकर्षक समुद्रकिनारे आणि शॉपिंग मॉल्ससाठी प्रसिद्ध आहे. इन्शन येथील शहरी दृश्ये आणि सांस्कृतिक स्थळे पर्यटकांसाठी एक अप्रतिम अनुभव ठरतात.