Picnic Spot: गोवा विसरा, महाराष्ट्रातलं ‘हे’ सुंदर ठिकाण लावतयं पर्यटकांना वेड, लोकेशन काय? जायचं कसं? वाचा सर्व डिटेल्स!
समुद्रकिनारा म्हटलं की गोव्याला जायचं असं तुमच्या मनात आलं असेल, पण जरा थांबा. महाराष्ट्रातही असं एक छान पर्यटनस्थळ आहे जिथे तुम्ही अशाच प्रकारच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता.

Maharashtra Hidden Tourist Place: सणासुदीचे दिवस आहेत, सुट्ट्यांचा काळ आहे. अशावेळी तुम्हीही छान समद्रकिनारी अन् निसर्गाच्या सानिध्यात ट्रीप प्लॅन करताय का? आता समुद्रकिनारा म्हटलं की गोव्याला जायचं असं तुमच्या मनात आलं असेल, पण जरा थांबा. महाराष्ट्रातही असं एक छान पर्यटनस्थळ आहे जिथे तुम्ही अशाच प्रकारच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता. महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात असलेले निवती खडक आणि दीपगृह हे ठिकाण आपल्या मनमोहक सौंदर्यामुळे आजकाल लक्ष वेधून घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे असलेले हे ठिकाण आपल्या शांत वातावरणासाठी, निळ्याशार समुद्रासाठी आणि नेत्रदीपक दृश्यांसाठी ओळखले जाते.
गोवा विसरा, महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण पाहा!
या ठिकाणचे निसर्गसौंदर्य सध्या पर्यटकांना भुरळ घालत आहे. याबाबत ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर शिवांगीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने या ठिकाणावरील पर्यटनस्थळाबाबत सर्व माहिती दिली आहे. तिने सांगितलं की, २ ते ३ तासांच्या बोट सफरीमुळे पर्यटकांना नेत्रदीपक खडक आणि चित्तथरारक सागरी दृश्ये पाहता येतात. व्हिडिओमध्ये, तिने या ठिकाणी कसे पोहोचायचे आणि पर्यटकांना कोणत्या विशेष गोष्टी पाहायला मिळतील हे देखील सांगितले आहे. त्यामुळे, जर तुम्ही वीकेंड ट्रिपची योजना आखत असाल, तर तुम्ही येथे भेट देऊ शकता.
संपूर्ण बोटही करु शकता बूक…
व्हिडिओमध्ये, शिवांगीने स्पष्ट केले की या बोट सफरीला अंदाजे 2-3 तास लागतात. जर पर्यटक इतर लोकांसोबत शेअर केलेल्या बोटीतून प्रवास करत असतील, तर त्याचे भाडे प्रति व्यक्ती सुमारे 500 ते 600 रुपये आहे. ज्यांना वैयक्तिक अनुभव हवा आहे, ते संपूर्ण बोट बुक करू शकतात, ज्याची किंमत अंदाजे 4000 ते 5000 रुपये आहे. यामुळे पर्यटकांना त्यांच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत या सुंदर सागरी प्रवासाचा आरामात आनंद घेता येतो.
या बोट सफरीत काय काय पाहाल?
या बोटीच्या सफरीदरम्यान पर्यटकांना 10 ते 12 विविध ठिकाणे पाहण्याची संधी मिळते. यामध्ये ओल्ड लाईटहाऊस, न्यू लाईटहाऊस, डॉल्फिन पॉईंट, म्हातारीची चूल, सिक्रेट टनेल, निवती रॉक्स, मिनी केरळ, सीगल आयलंड, सुनामी आयलंड आणि निवती गोल्डन रॉक्स यांसारख्या सुंदर ठिकाणांचा समावेश आहे. हे समुद्रकिनारी असलेले ठिकाण त्याच्या अद्वितीय नैसर्गिक देखाव्यासाठी, खडकांच्या रचनांसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते, ज्यामुळे ही सहल पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरते.