धबधब्यावर जाताना किंवा ट्रेकिंगवर जातान तंबाखू घेऊ नक्की जा, कारण जाणून आश्चर्य वाटेल

पावसाळ्यात ट्रेकिंग किंवा धबधब्यांना भेट देणं म्हणजे सर्वांचचं आवडीचं. पण तुम्हाला माहितीये का की यावेळी आपली सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची असते. त्यासाठी तंबाखू जवळ ठेवणे गरजेचे आहे. तंबाखू खाण्यासाठी नाही तर आपल्या सुरक्षेसाठी. कशी ते जाणून घेऊयात.

धबधब्यावर जाताना किंवा ट्रेकिंगवर जातान तंबाखू घेऊ नक्की जा, कारण जाणून आश्चर्य वाटेल
Protect Yourself on Treks, Using Tobacco to Repel Leech Bites
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jun 29, 2025 | 11:28 AM

पावसाळा म्हटलं की सर्वाचं आवडीचं ठिकाण म्हणजे धबधबा किंवा ट्रेकिंग. अनेकजण आधीच प्लॅनिंग करतात. पण धबधबे किंवा ट्रेकिंगच्या ज्या काही जागा असतात त्या शक्यतो आड-राणावर, किंवा जिथे फार मनुष्यवस्ती नसते अशाच ठिकाणी असतात. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना, धबधब्यावर जाताना काही गोष्टी सोबत नेऊन जाणं फार गरजेचं असतं. त्यातील एक गोष्ट म्हणजे मीठ आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखू. तंबाखू खाण्यासाठी नाही तर आपलं संरक्षण करण्यासाठी. होय, कसं ते पाहुयात.

या धबधब्यावर जाताना तंबाखू घेऊन जाणे गरजेचे

जसं की एका धबधब्याचं उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूरातील ते जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध असणारा धबधबा म्हणजे शाहूवाडी तालुक्यातील बर्की हा धबधबा. बर्की हा धबधबा कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. बर्की धबधब्यासाठी जंगलातून काही अंतर चालत जावे लागते. बर्की धबधब्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.पण, धबधब्यावर जात असताना तुमच्याकडे मीठ नाही घेऊन जाता आलं तरी तंबाखू घेऊन जाणे महत्वाचे आहे.

तंबाखू कशी ठेवेल सुरक्षीत?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तंबाखू कशासाठी हवी? या धबधब्याजवळ जात असताना जंगलातून चालत जावे लागते. जंगलातून वाटेने चालत जात असताना आपल्या शरीराला रक्त शोषणारे जळू चिकटतात.आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी जळू चिकटतो तिथे तो रक्त शोषतो. शरिरावर चिकटलेला जळू काढण्यासाठी तंबाखूचा वापर केला जातो. शरिरावर जळू चिकटल्यानंतर त्या जळूवर लगेच तंबाखू टाकल्यानंतर तो जळू शरिरावरून निघून पडतो. यासाठी तिकडे फिरायला जात अताना तंबाखू जवळ ठेवली जाते.

तंबाखूमुळे या गोष्टींपासून होईल संरक्षण  

गावाकडच्या पारंपरिक पद्धतीनुसार शरीराला जळू लागल्यास त्यावर तंबाखू टाकली जाते.तंबाखू टाकल्यानंतर जळू निघून पडतो. शरीराला चिकटणाऱ्या जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठही वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो. पण जर तुम्हाला मीठ घेऊन जाणे शक्य नसेल तर तंबाखू तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होईल . ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. ट्रेकिंगला जातान देखील तुम्ही ही युक्ती वापरू शकता.

तबांखूमध्ये असणारे घटक….

जळूंना तंबाखूचा वास आवडत नाही. तंबाखूमध्ये असलेले काही घटक जळूंना प्रतिकारशक्ती निर्माण करतात. ज्यामुळे ते तुमच्याजवळ येत नाहीत. तुम्ही तंबाखू पाण्यात भिजवून किंवा तंबाखूची पूड तुमच्या पायांवर आणि कपड्यांवर लावू शकता. तंबाखूचा वापर करताना, तुमच्या त्वचेवर जास्त वेळ राहू नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.