Skincare for holi : बिनधास्त खेळा होळी ! रंग घालवायला हे उटणं आहे रेडी ! ड्राय स्किनचाही नाही धोका

जर तुम्हाला होळी खेळण्याची खूप आवड असेल, तर होळीच्या रंगांमुळे त्वचेचं जे नुकसान होत त्यापासून त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत हे उटणं तुमची मदत करू शकतं.

Skincare for holi : बिनधास्त खेळा होळी ! रंग घालवायला हे उटणं आहे रेडी ! ड्राय स्किनचाही नाही धोका
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 2:39 PM

Ubtan for Holi : होळी, रंगपंचमीचा सण जवळ येताच लोकांमध्ये उत्साह संचारतो. रंग खेळायला आवडत नाही असा क्वचितच एखादा माणूस किंवा व्यक्ती असेल. सर्वांनांच रंगात माखून जायला खूप आवडतं. हळूहळू होळी कुठे खेळायची, सुके रंग वापरायचे की ओले, नैसर्गिक रंग कसे बनवायचे, अशा विविध विषयांवर चर्चा सुरू झालेली असेल. मात्र होळाची विषय येताच आणखी एक विषय समोर येतो तो म्हणजे स्किन केअरचा. कारण होळीच्या रंगामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अशावेळी त्यापासून कस वाचायचं याचीही अनेकजण चर्चा करत असतात.

तुम्हालाही रंग खेळायला आवडत असतील आणि या वर्षी जोरदार होळी खेळायचा तुमचा प्लान असेल तर फिकर नॉट.. ! होळी खेळायच्या आधी काळजी घेताच, तशीच काळजी नंतर घ्या. होळी खेळू झाल्यावर त्वचेसाठी खास उटणं लावू शकता, जे ड्राय स्किन वाल्या लोकांसाठीही खूप फायदेशीर ठरेल.

नैसर्गिक घटकांपासून बनलेलं हे उटणं कसं तयार करायचं आणि त्याचे फायदे काय तेही जाणून घेऊया.

होळी स्पेशल उटणं

ही उटणं बनवण्यासाठी एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन, हळद घ्या. नंतर त्यामध्ये थोडं खोबरेल तेल आणि गुलाबपाणी टाका. हे सर्व मिश्रण नीट मिसळा आणि हे चेहऱ्यावर, तुमच्या त्वचेवर लावा. 20 ते 30 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर चेहरा आणि त्वचा हलक्या हाताने रगडून उटणं काढून टाका. नंतर तुमचा चेहरा. त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. मात्र यानंतर मॉयश्चरायझर लावायला विसरू नका हं.

उटण्याचे फायदे

संपूर्ण नैसर्गिक घटकांनी बनलेलं हे उटणं आपली त्वचा घट्ट (skin tightening) करण्यास मदत करू शकते. तसेच या उटण्यामधील तांदळाचं पीठ चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि मोठी छिद्रे कंप्रेस करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे चेहऱ्यावरचा सैलसरपणा कमी होऊ शकतो. तसेच, उटण्यामध्ये असलेले बेसन त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि होळीचे रंग काढून टाकण्यास मदत करू शकते. हे मृत त्वचेच्या पेशींमध्ये अडकलेली घाण काढून टाकण्यास देखील मदत करू शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा

– ही उटणं फक्त घसा, कपाळ, नाक आणि मानेवर लावा. डोळ्याभोवती उटणं लावणं टाळा. कारण डोळ्यांजवळील त्वचा अतिशय नाजूक असते. आणि उटणं रिमूव्ह करताना तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो.

– जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे, पिंप्लस असतील तर हे उटणं लावू नका. कारण यामुळे पिंपल्स फुटून त्रास वाढू शकतो आणि संसर्ग पसरू शकतो. तसेच रासायनिक रंगांचा वापर टाळावा.

– उटणं रिमूव्ह करताना, हलक्या हातांनी गोलाकार पद्धतीने मसाज करावा. त्वचा खूप वेगाने घासल्याने पुरळ उठू शकते. तुम्ही पाण्याचा वापर करून देखील हे रिमूव्ह करू शकता. वास्तविक, बेसन आणि तांदूळ दोन्ही लवकर सुकतात, अशा परिस्थितीत ते काढणे कठीण होऊ शकते. त्यामुळे हलक्या हाताने उटणं रिमूव्ह करा.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.