Skin Care tips : ‘सन टॅन’ दूर करण्यासाठी वापरा कच्चे दूध! जाणून घ्या, कच्च्या दुधापासून कसे तयार करायचे फेसपॅक

| Updated on: Jun 11, 2022 | 10:22 PM

स्किन केअर टिप्स : उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेची समस्येने प्रत्येकजन त्रस्त असतो. यासाठी सन स्क्रीन क्रीमचा वापर केला जातो. यासोबतच विविध घरगुती उपाय वापरूनही आपण टॅन दूर करता येते. अशाचप्रकारे कच्चे दुध वापरूनही आपली त्वचा स्वच्छ ठेवता येते. जाणून घ्या, कश्या प्रकारे कच्चे दुध वापरून, स्कीन टॅन दूर करता येऊ शकते.

Skin Care tips : ‘सन टॅन’ दूर करण्यासाठी वापरा कच्चे दूध!  जाणून घ्या, कच्च्या दुधापासून कसे तयार करायचे फेसपॅक
Milk Face Pack
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्णतेमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हानिकारक अतिनील किरणांमुळे (Due to UV rays) त्वचेचे मोठे नुकसान होते. अनेक वेळा सनस्क्रीन वापरल्यानंतरही त्वचेला सन टॅन होतो. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. पण सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. अशा परिस्थितीत, सन टॅनपासून मुक्त (Free from sun tan) होण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. कच्च्या दुधाचा वापर केल्याने सन टॅन दूर होण्यापासूनही आराम मिळतो. हे आपल्या त्वचेला टवटवीत करण्याचे काम करते. दुधात लॅक्टिक ऍसिड असते. हे त्वचेला टवटवीत करण्याचे काम करते. सन टॅन दूर करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता. परंतु हे दुध कच्चे हवे (Milk should be raw) म्हणजेच न तापवलेले थंड दुध वापरून आपल्या त्वचेचा रंग उजळवता येतो.

सन टॅन घालवण्यासाठी कच्चे दूध वापरा

एका भांड्यात थोडे कच्चे दूध घ्या. त्यात कापसाचा गोळा भिजवा. या कॉटन बॉलने त्वचा स्वच्छ करा. 10 मिनिटे त्वचेवर तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय आपण दिवसातून 1 ते 2 वेळा करू शकता. सन टॅन दूर करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

कच्चे दूध आणि मध

सन टॅन दूर करण्यासाठी तुम्ही कच्चे दूध आणि मध देखील वापरू शकता. यासाठी 2 चमचे कच्च्या दुधात अर्धा चमचा मध मिसळा. ते चांगले मिसळा. चेहरा आणि मानेवर गोलाकार हालचालीत हलक्या हाताने मसाज करा. याने काही वेळ त्वचेला मसाज करत राहा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवा. सन टॅन काढण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचा वापर करू शकता.

हे सुद्धा वाचा

कच्चे दूध आणि तांदळाचे पीठ वापरावे

एका भांड्यात १ ते २ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात थोडे कच्चे दूध घाला. एकत्र मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा. याने काही वेळ त्वचेला मसाज करा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवा. तुम्ही हा घरगुती पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

कच्चे दूध आणि स्ट्रॉबेरी वापरा

हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला ४ ते ५ स्ट्रॉबेरी लागतील. या स्ट्रॉबेरीचे मिश्रण करून, त्याचा लगदा काढा. आता स्ट्रॉबेरी पल्पमध्ये 1-2 चमचे दूध घाला. ते चांगले मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. याने त्वचेला 2 मिनिटे मसाज करा. 10 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.