काही मिनिटांतच कारल्याच्या भाजीचा कडूपणा होईल दूर, 5 सोप्या टिप्सचा करा वापर

कारल्याची भाजी म्हंटली की केवळ लहान मुलेच नाही, तर प्रौढ व्यक्तीसुद्धा ही भाजी खाणे टाळतात. पण आता काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही कारल्याला किंचित गोड चव देऊ शकता. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

काही मिनिटांतच कारल्याच्या भाजीचा कडूपणा होईल दूर, 5 सोप्या टिप्सचा करा वापर
Karela
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 10:46 PM

कारलं खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारल्याच्या भाजीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. अशातच कारले चवीला खूप कडू असते, ज्यामुळे बरेच लोकं ते खायला नकार देतात. परंतु, काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही कारल्याचा कडूपणा लक्षणीयरीत्या कमी करू शकता. ज्यामुळे ही भाजी अधिक चविष्ट लागते. चला तर मग आजच्या लेखात आपण कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठीच्या सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

कारले इतके कडू का असते?

कारल्यामध्ये नैसर्गिकरित्या काही घटक असतात ज्यामुळे त्याला कडू चव येते. जेव्हा आपण कारले खातो, तेव्हा आपल्या जिभेला हे कडू घटक लगेच जाणवतात. पण हा कडूपणा कमी करण्यासाठी तुम्ही मीठ, दही, कांदा, हळद आणि मोहरीचे तेल यांसारखे काही गोष्टींचा वापर केल्यास त्याची कडवट चव कमी करण्यास मदत करतात.

मीठामुळे कडूपणा कमी होतो

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी मीठ हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. कापलेल्या कारल्याला मीठ लावून तसेच थोडावेळ ठेवा. त्यानंतर यामध्ये मीठामुळे पाणी तयार होते. हे पाणी हळूहळू कारल्यातील कडू घटक काढून टाकते. म्हणून हे पाणी काढल्यानंतर पाण्याने बारीक चिरलेली कारली काही वेळ धुवा. अशाने कारल्याची चव पूर्वीपेक्षा खूपच सौम्य होते.

दही कारल्याची चव संतुलित करते

दह्यामधील सौम्य आंबटपणा कारल्याची कडू चव कमी करण्यास मदत करतो. त्याची चव जिभेवर संतुलन साधते आणि कडूपणा कमी करते. शिवाय दह्यामधील लॅक्टिक ॲसिड आणि फायदेशीर जिवाणू कारल्याच्या बाहेरील थरावर कार्य करतात, ज्यामुळे त्याची चव आणखी सौम्य होते.

हळदीमुळे कारल्याच्या कडवटपणा सौम्य होतो

हळद तिच्या तीव्र सुगंधासाठी आणि अद्वितीय नैसर्गिक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. जेव्हा हळद कारल्यामध्ये मिक्स केली जाते, तेव्हा तिचा सुगंध आणि सौम्य तिखटपणा भाजीतील कडूपणा कमी करण्यास मदत करतात. हळदीमधील कर्क्युमिन चव संतुलित करण्यासही मदत करते असे मानले जाते.

कांद्याचा गोडवा कमाल करतो

जेव्हा कारले कांद्यासोबत शिजवले जाते, तेव्हा कांद्याचा सौम्य गोडवा त्याच्या कडूपणाला संतुलित करतो. आपली जीभ एकाच वेळी अनेक चवी ओळखते, त्यामुळे गोड आणि कडू चवींची ही भाजी कडूपणा कमी करण्यास मदत करते. म्हणूनच कांद्यासह कारले चविष्ट लागते.

मोहरीच्या तेलामुळे कारल्याचा कडूपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो

मोहरीच्या तेलाला तीव्र सुगंध आणि सौम्य तिखटपणा असतो, ज्यामुळे पदार्थांची चव वाढण्यास मदत होते. जेव्हा मोहरीच्या तेलात कारले शिजवले जाते, तेव्हा तेलाचा सुगंध त्याचा कडूपणा मोठ्या प्रमाणात कमी करून टाकतो. शिवाय मोहरीच्या तेलातील नैसर्गिक घटक चव वाढवतात.

Follow Us