उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?

व्हिटॅमिन सी सीरम त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि कोलेजन वाढवण्यास मदत करतात. मात्र वाढत्या ट्रेंडमुळे अनेक सीरममध्ये असे केमिकल असतात जे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.

उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
homemade serum face
| Edited By: | Updated on: Mar 11, 2026 | 3:03 PM

आजकाल प्रत्येकालाच चमकदार, निर्दोष त्वचा हवी असते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण यासाठी व्हिटॅमिन सी सीरमची निवड करत आहे. कारण व्हिटॅमिन सी सीरम लावल्याने त्वचेचा रंग सुधारतो, चेहऱ्यावरील डाग कमी होते आणि त्वचेला उजळवण्यास मदत करतात. त्यातच तुम्हाला बाजारात अनेक ब्रँडचे व्हिटॅमिन सी सीरम खरेदी करता येतात. या सीरममध्ये अनेकदा प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा इतर केमिकल असतात, जी संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना योग्य केमिकलमुक्त सीरम शोधणे देखील आव्हानात्मक बनले आहे. पण तुम्ही केमिकलमुक्त सीरम बाजारात शोधण्याऐवजी ते घरी बनवू शकता.

घरगुती सीरम हे नैसर्गिक घटकांपासून बनवले जातात, त्यामुळे त्यात कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही. हे घरगुती सीरम त्वचेसाठी अधिक सुरक्षित मानले जातात. महत्त्वाचे म्हणजे, कोरफड, गुलाबपाणी किंवा व्हिटॅमिन सी पावडर सारखे घटक त्वचेला पोषण देतात. त्वचेला हायड्रेटेड आणि फ्रेश ठेवतात. चला तर मग आजच्या लेखात आपण घरगुती पद्धतीने व्हिटॅमिन सी सीरम बनवण्याचा एक सोपा मार्ग जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन सी सीरमचे फायदे

व्हिटॅमिन सी सीरम त्वचेच्या काळजीसाठी खूप फायदेशीर मानले जाते. या सीरम मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला मुक्त रॅडिकल्स आणि हानिकारक सूर्य किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

सीरमच्या नियमित वापरामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि हळूहळू डाग, पेगमेंटेशन आणि टॅनिंग कमी होते. त्वचेमधील कोलेजन उत्पादनास देखील प्रोत्साहन देते, परिणामी त्वचा अधिक घट्ट, मऊ आणि तरुण दिसते. शिवाय व्हिटॅमिन सी सीरम त्वचेला हायड्रेट करण्यास नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. म्हणूनच आजच्या युगात हे सी सीरम स्किनकेअर रूटीनचा एक आवश्यक भाग मानले जाते. आता हे व्हिटॅमिन सी सीरम कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

घरी व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 चमचा व्हिटॅमिन सी पावडर किंवा संत्र्या/लिंबाच्या सालीची पावडर
  • 2 चमचे गुलाबपाणी
  • 1 टीस्पून कोरफड जेल
  • 3/4 थेंब व्हिटॅमिन ई तेल (पर्यायी)
  • एक छोटी पारदर्शक काचेची बाटली

सीरम बनवण्याची पद्धत

एका स्वच्छ भांड्यात दोन चमचे गुलाबपाणी घ्या. त्यात व्हिटॅमिन सी पावडर टाकून मिश्रण चांगले मिक्स करा. आता यामध्ये कोरफड जेल टाकून स्मूद मिश्रण बनवा. शेवटी व्हिटॅमिन ई तेलाचे 3 ते 4 थेंब मिक्स करा. तयार केलेली पेस्ट एका काचेच्या बाटलीत ड्रॉपरने भरा. तुमचा घरगुती व्हिटॅमिन सी सीरम तयार आहे.

तुम्ही हे सीरम रात्री झोपण्याआधी लावा. प्रथम तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. आता सीरमचे 2 ते 3 थेंब घ्या आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. हळूवारपणे मालिश करा. यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. पण हे सीरम त्वचेवर लावण्याआधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जसे की ते लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर लिंबू कमी वापरा. ​​तसेच ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे टाळा.

Follow Us