Vacation Trip | भारताशेजारील ‘या’ देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची गरज नाही!

| Updated on: Oct 13, 2020 | 7:46 PM

भारताबाहेर प्रवास करायचा असेल, दुसऱ्या देशांत जायचे असेल तर, व्हिसा मिळवणे सगळ्यात महत्त्वाचे असते. शिवाय कमी खर्चात फिरण्यासाठी पर्याय शोधले जातात.

Vacation Trip | भारताशेजारील ‘या’ देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची गरज नाही!
Follow us on

मुंबई : गेल्या काही वर्षात परदेशी फिरायला जाऊन सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी जरी कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सगळे घरात अडकले असले तरी, सद्य परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा एकदा सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी सध्या नवे पर्याय शोधले जात आहेत. भारताबाहेर प्रवास करायचा असेल, दुसऱ्या देशांत जायचे असेल तर, व्हिसा मिळवणे सगळ्यात महत्त्वाचे असते. याशिवाय कमीत कमी खर्चात आपण कुठे फिरू शकतो, यासाठी पर्याय शोधले जातात. तुम्हालाही फिरायचे असेल तर, व्हिसाची आवश्यकता नसलेल्या या शेजारी देशांबद्दल माहिती जाणून घेतलीच पाहिजे. (Vacation Trip destinations where we travel without visa)

बारबाडोस

कॅरिबियन देशात बारबाडोस बेट वसले आहे. या बेटावर फिरण्यासाठी अथवा राहण्यासाठी भारतीयांना ‘टूरिस्ट व्हिसा’ची गरज लागत नाही. भारतीय प्रवासी व्हिसाशिवाय 90 दिवस येथे राहू शकतात.

भूतान

भूतान हा भारताचा एक शेजारी देश आहे. सुंदर जंगल, पर्वत आणि लँडस्केपसाठी भूतान देश प्रसिद्ध आहे. इथली संस्कृती जाणून घेण्यासाठी दरवर्षी लाखो लोक या देशाला भेट देतात. भारतीय लोक या देशात व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. (Vacation Trip destinations where we travel without visa)

मालदीव

मालदीव देश जगातील सगळ्यात सुंदर बेटांपैकी एक आहे. मालदीवचे वैशिष्ट्य म्हणजे हे बेट 99 टक्के पाण्याने व्यापलेले आहे. तर, केवळ 1 टक्के भूभाग आहे. कामाचा ताणतणाव आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी यापेक्षा चांगली जागा कुठेच नाही, असे म्हटले जाते. बॉलिवूडचे अनेक कलाकार आपल्या कामातून विश्रांती घेऊन मालदीवमध्ये आराम करताना दिसतात. या देशात ‘व्हिसा ऑन अराइव्हल’ पद्धत असल्याने आधीच व्हिसाची तरतूद करावी लागत नाही.

मॉरिशस

मॉरिशस हे हिंदी महासागरात वसलेले एक बेट आहे. समुद्रकिनारे, लगून आणि दगडांच्या वैविध्यतेसाठी हा देश प्रसिद्ध आहे. या देशात मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी दिसतात. मॉरीशसमध्ये बर्‍याच ठिकाणी अशी आहे की, जी पाहिल्याशिवाय तुमची ट्रीप पूर्ण होऊच शकत नाही. मॉरिशस चहुबाजूंनी पाण्याने वेढलेले बेट आहे. (Vacation Trip destinations where we travel without visa)

नेपाळ

नेपाळ हा आपला सगळ्यात जवळचा शेजारी देश आहे. नेपाळमध्ये बरीच ठिकाणे बघण्यासारखी आहेत. भारतीय लोकांना नेपाळमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही. नेपाळची राजधानी काठमांडूमधील पशुपती मंदिर हे हिंदू मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर वैदिक काळात तयार केले गेल्याचे मानले जाते. नेपाळची राजधानी काठमांडू हिमालयातील टेकड्यांनी वेढलेली आहे.

(Vacation Trip destinations where we travel without visa)