
शहाळेः ताप येऊन गेल्यानंतर शरीरातील पाणी कमी होते आणि शरीर अशक्त होते. त्यामुळे शरीराला शहाळ्याची गरज असते, त्याचा फायदा आरोग्याला होतो.

ड्राय फ्रूटसःशरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठी ड्राय फ्रूटसची मदत घेतली जाते. ड्राय फ्रूटसमुळे शरीराला ताकद मिळते. त्यामुळे आपल्या खाण्यात बदाम, पिस्तासारखे ड्राय फ्रूटस् वापरा

केळीः शरीरातील अशक्तपणा दूर करायचा झाल्यास आपल्या खाण्यामध्ये रोज दोन केळ्याचे सेवन करा. केळ्यातील पोटॅशियम, विटॅमिन बी 6, मॅग्निशियम आणि विटॅमिन सी भरपूर मिळू शकते.

पालेभाज्याःआरोग्यासाठी सगळ्यात फायदेशीर काय असेल तर पालेभाज्या. शरीरातील अशक्तपणा दूर करायचा असेल पालेभाज्यांचे सेवन करा. यामुळे शरीरातील पाणी वाढू शकते.

लसूणः बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकला लागला असेल तर जेवणामध्ये लसूणाचा वापर करा. जास्त त्रास होत असेल तर लसूणचे सूपही तुम्ही घेऊ शकता