शरीरात झपाट्यानं वाढेल व्हिटॅमिन बी 12, फक्त दह्यासोबत सेवन करा 10 रुपयांमध्ये मिळणारी ही एक वस्तू

व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी अत्यंत गरजेच आहे. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमी असेल तर यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

शरीरात झपाट्यानं वाढेल व्हिटॅमिन बी 12, फक्त दह्यासोबत सेवन करा 10 रुपयांमध्ये मिळणारी ही एक वस्तू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2025 | 8:02 PM

व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी अत्यंत गरजेच आहे. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमी असेल तर यामुळे चिडचिडेपणा, एखादी गोष्ट लगेच विसरणे आणि त्वचा व केसांशी संबंधित विविध समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला देखील तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरू काढायची असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ज्या पदार्थांपासून मोठ्या प्रमाणात हे जीवनसत्त्व मिळतं त्या पदार्थांचा समावेश करावा लागेल.

जेव्हा -जेव्हा व्हिटॅमिन बी 12 बाबत बोललं जातं, तेव्हा मटण आणि चिकन या दोन गोष्टी लगेचच डोळ्यासमोर येतात, कारण मटण आणि चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असंत. हे दोन पदार्थ व्हिटॅमिन बी 12 चा सर्वोत्तम स्त्रोत आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की, जे लोक शाकाहारी आहेत, ते व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढू शकत नाहीत. आज आपण अशा काही पदार्थांबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 आहे.

या पदार्थांचा आहारा करा समावेश

दही आणि अळशीच्या बिया जर तुम्हाला देखील तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करायची असेल तर तुम्ही आळशीच्या बिया दह्यामध्ये मिक्स करून खाऊ शकतात. यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 मिळू शकतं. तसेच यामध्ये ओमेगा 3 आणि फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं.

दही आणि भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया या आयरन, मॅग्नेशियम आणि झिंकचा उत्तम स्त्रोत असतात. अनेक प्रकारच्या डायटमध्ये देखील भोपळ्यांच्या बियांचा समावेश केला जातो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करायची असेल तर तुम्ही भोपळ्याच्या बिया दह्यात मिक्स करून खाऊ शकता.

दही आणि जिरा – जिऱ्याचा वापर स्वयंपाक घरामध्ये एक मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो, मात्र दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असंत, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोईनुसार दह्यात जिरे मिक्स करून त्याचं सेवन करू शकतात.

टीप – वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, याला आमचा कुठलाही दुजोरा नाही, कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.