‘रणवीर सिंगने स्वतःच करोडोंची तिकिटे खरेदी केली…’, ‘धुरंधर’च्या रिलीजच्या दिवशी अभिनेत्याचा धक्कादायक दावा
रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट आज 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांकडून तरी चित्रपटाबाबत चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. पण चित्रपटाच्या पहिल्याच दिवशीच्या प्रदर्शनानंतर एका अभिनेत्याने धक्कादायक दावा केला आहे. रणवीरने चित्रपटाच्या चांगल्या ओपनिंगसाठी करोडो रुपयांची तिकिटे स्वतःच खरेदी केल्याचा आरोप या अभिनेत्याने केला आहे.

रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट “धुरंधर” आज, शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरने बरीच चर्चा निर्माण केली होती. चित्रपट आज रिलीज झाला आहे. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया देखील चांगल्या येत आहे. चित्रपटाची पहिल्याच दिवशी चांगली कमाई होत असल्याचं दिसत आहे. पण यादरम्यान एका अभिनेत्याने मात्र चित्रपटाबद्दल आणि रणवीर सिंगबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ज्याबद्दल आता सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
अभिनेत्याची “धुरंधर” च्या रिलीजच्या दिवशी एक धक्कादायक पोस्ट
स्व-समीक्षक आणि अभिनेता असलेले केआरकेने “धुरंधर“ च्या रिलीजच्या दिवशी एक धक्कादायक पोस्ट केली आहे. ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं आहे. केआरकेने त्याच्या अधिकृत अकाउंटवरील पोस्टमध्ये दावा केला आहे की रणवीर सिंगने स्वतः त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपटासाठी करोडो रुपयांची तिकिटे खरेदी केली. केआरकेने लिहिले आहे की, “रणवीर सिंगने धुरंधरच्या चांगल्या ओपनिंगची घोषणा करण्यासाठी काही कोटी रुपयांची तिकिटे खरेदी केली. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चित्रपटाची आगाऊ तिकिटे विकल्या गेली आहे. त्या तिकिटांची संख्या सुमारे 70,500 होती, परंतु मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, एकूण विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या 1,38, 855 होती. म्हणजे, फक्त 7 तासांत दुप्पट तिकिटे”
‘रणवीर सिंगने स्वतःच करोडोंची तिकिटे खरेदी केल्याचा आरोप
केआरकेने त्याच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “असे दिसते की फक्त पीव्हीआर आयनॉक्स धुरंधर चित्रपटाची तिकिटे विकत आहे आणि इतर सर्व थिएटर प्रेक्षकांची वाट पाहत आहेत. कारण जिओ स्टुडिओ आणि रणवीर फक्त पीव्हीआर आयनॉक्समधून तिकिटे खरेदी करत आहेत.रणवीर सिंगची कारकिर्द संपली आहे, अगदी अर्जुन कपूरसारखी. आता दोन्ही मित्र एकाच बोटीत आहेत आणि बोट एका अज्ञात स्थळी जात आहे! एक आपत्ती!” असं म्हणत त्याने थेट आरोप लावले आहेत.
धुरंधर पाहिल्यानंतर बॉलिवूड गप्प का आहे?
केआरकेने पुढे लिहिले आहे की, “काल रात्री, संपूर्ण बॉलिवूडने धुरंधर चित्रपट पाहिला आणि सर्वजण गप्प आहेत. सर्वजण स्तब्ध आहेत! 2025 चा सर्वात मोठा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच आपत्तीत सापडला आहे.”
Finally @RanveerOfficial bought few crore Rupees tickets to declare good opening of #Dhurandhar!
Advance for Friday 05th December 2025 in #PVRINOX! At 5 pm on Thursday, total tickets were sold~ 70,500 But at 12 pm midnight total tickets were sold 1,38,855. Means double in 7hours…
— KRK (@kamaalrkhan) December 5, 2025
केआरकेने धुरंधरच्या टाईमिंगवरही टीका
केआरकेने चित्रपटाच्या टायमिंगवरूनही टीका केली. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “धुरंधरचा पहिला भाग 2 तास 4 मिनिटे लांब आहे. याचा अर्थ दुसरा भाग पाहण्याची हिंमत कोणीही करणार नाही. दिग्दर्शक आदित्य धर यांनी लोकांचा वेळ वाचवण्याचे उत्तम काम केले आहे!”
त्यांनी एका माहितीपटावर 300 + कोटी कसे खर्च केले?
केआरकेने आदित्य धरवरही टीका केली आणि लिहिले, “आता पाहत असलेल्या एका बॉलिवूड दिग्दर्शकाने धुरंधर चित्रपटाचा आढावा घेतला आहे! हा एक अतिशय संथ चित्रपट आहे. आदित्य धरने या चित्रपटावर 300+ कोटी कसे खर्च केले हे मला समजत नाही आणि जिओने या निकृष्ट चित्रपटावर एवढे कोटी कसे खर्च करण्यास सहमती दर्शविली हे देखील मला समजत नाही.” असं म्हणत केआरकेने धुरंधर, रणवीर अन् दिग्दर्शकावर देखील टीका केली आहे.
‘धुरंधर’ चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
