AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांतारामधल्या ‘चावुंडी देवी’चा रणवीरकडून अपमान; तक्रार दाखल होताच उचललं हे पाऊल

अभिनेता रणवीर सिंहने चावुंडी देवीचा अपमान केल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रणवीरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इफ्फीच्या मंचावर रणवीरने ऋषभ शेट्टीने साकारलेल्या चावुंडी देवीची नक्कल केली होती.

कांतारामधल्या 'चावुंडी देवी'चा रणवीरकडून अपमान; तक्रार दाखल होताच उचललं हे पाऊल
Rishab Shetty and Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 02, 2025 | 11:56 AM
Share

गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसाच्या (इफ्फी) समारोप समारंभात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने (HJS) रणवीरविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केल्याने रणवीरवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यादरम्यान आता त्याने जाहीर माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझे हेतू नव्हता, असं त्याने स्पष्ट केलंय. यासंदर्भात रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

रणवीर सिंहचा माफीनामा-

कांतारा या चित्रपटातील ऋषभच्या अभूतपूर्व परफॉर्मन्सला अधोरेखित करण्याचा माझा हेतू होता. ऋषभने तो ठराविक सीन ज्या जबरदस्त पद्धतीने सादर केला, त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे मला माहित आहे. त्यासाठी मी त्याचं खूप कौतुक करतो. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं मी नेहमीच मनापासून आदर करतो. माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, अशा शब्दांत रणवीरने दिलगिरी व्यक्त केली.

तुलू समुदायात चावुंडी देवीला खूप मानलं जातं. अशा देवीचं अपमानास्पद पद्धतीने चित्रण किंवा वर्णन करणं म्हणजे त्यांचा अनादर करण्यासारखंच आहे. अशा कृत्यामुळे जनतेत आक्रोश पसरू शकतो आणि शांती भंग होऊ शकते, असं हिंदू जनजागृती समितीने तक्रारीत म्हटलंय.

‘इफ्फी’च्या मंचावर रणवीर सिंहने चावुंडी देवीची नक्कल केली आणि कोटितुलू समुदायासाठी पूजनीय असलेल्या या दैवाचा उल्लेख त्याने ‘स्त्री भूत’ असा केला होता. त्याने डोळे मोठे करून आणि जीभ बाहेर काढून देवीची नक्कल केली होती. इतकंच नाही तर रणवीर म्हणाला होता, “मी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला आणि त्यात ऋषभचा परफॉर्मन्स जबरदस्त होता. खासकरून तेव्हा जेव्हा तुझ्या अंगात स्त्री-भूत येते.” यानंतर रणवीर जेव्हा मंचावरून खाली उतरतो आणि ऋषभ शेट्टीजवळ जातो, तेव्हासुद्धा तो तशीच नक्कल करत खिल्ली उडवतो. ऋषभ त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याकडे रणवीर लक्ष देत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.