AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kantara : Chapter 1: ‘कांतारा : चाप्टर 1’ने मोडले 100 वर्षांतील ब्लॉकबस्टर्सचे रेकॉर्ड

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा : चाप्टर 1' हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या बारा दिवसांत या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाने फक्त 10 चित्रपट वगळता सर्व ब्लॉकबस्टर्सचे विक्रम मोडले आहेत.

Kantara : Chapter 1:  'कांतारा : चाप्टर 1'ने मोडले 100 वर्षांतील ब्लॉकबस्टर्सचे रेकॉर्ड
Kantara Chapter 1 recordsImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2025 | 1:57 PM
Share

दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘कांतारा : चाप्टर 1’ बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. पहाटेचा शो असो किंवा रात्री उशिराचा.. थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. गेल्या 12 दिवसांपासून हा चित्रपट विविध भाषांमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. 2025 या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. इतकंच नव्हे तर फक्त 10 चित्रपट वगळता ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : चाप्टर 1’ने गेल्या 100 वर्षांत प्रदर्शित झालेल्या सर्व ब्लॉकबस्टर्सचा विक्रम मोडला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे. कांताराची सुरुवात कशी झाली, दैव कोला किंवा भूत कोलाच्या प्रथेमागील कथा काय आहे, याचं चित्रपट या प्रीक्वेलमध्ये करण्यात आलं आहे.

सुरुवातीच्या 8 दिवसांत या चित्रपटाने 337.4 कोटी रुपये कमावत ‘सैयारा’ला मागे टाकलं होतं. त्यानंतर नवव्या दिवशी 22.25 कोटी रुपये, दहाव्या दिवशी 39 कोटी रुपये आणि अकराव्या दिवशी तब्बल 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. बाराव्या दिवशी सकाळी 10.40 वाजेपर्यंत 13.50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजेच आतापर्यंतची एकूण कमाई 451.90 कोटी रुपये झाली आहे. या आकड्यात आणखी वाढ होऊ शकते.

‘कांतारा : चाप्टर 1’ने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. यात फक्त दहा असे चित्रपट आहेत, ज्यांचा रेकॉर्ड अद्याप ऋषभ शेट्टीचा चित्रपट मोडू शकली नाही. हे कोणते चित्रपट आहेत, ते पाहुयात..

  • पुष्पा 2 द रूल- 1234.1 कोटी रुपये
  • बाहुबली 2- 1030.42 कोटी रुपये
  • केजीएफ 2- 859.7 कोटी रुपये
  • कल्की 2898 एडी- 646.31 कोटी रुपये
  • जवान- 640.25 कोटी रुपये
  • छावा- 601.54 कोटी रुपये
  • स्त्री 2- 597.99 कोटी रुपये
  • अॅनिमल- 553.87 कोटी रुपये
  • पठाण- 543.09 कोटी रुपये
  • गदर 2- 525.7 कोटी रुपये

ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा : चाप्टर 1’ या चित्रपटाचं बजेट 125 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या 11 दिवसांत या चित्रपटाने 614.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा आकडा जगभरातील कमाईचा आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीसोबतच रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. दिवाळीपर्यंत या चित्रपटासमोर कोणतीच मोठी स्पर्धा नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर रश्मिका मंदाना आणि आयुषमान खुरानाचा ‘थामा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘कांतारा : चाप्टर 1’ला तगडी टक्कर देऊ शकतो.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.