AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kantara: Chapter 1: ‘कांतारा: चाप्टर 1’चा क्लायमॅक्स शूट करताना अशी होती ऋषभ शेट्टीची अवस्था, नेटकऱ्यांनी जोडले हात

Kantara: Chapter 1: बॉक्स ऑफिसवर सध्या 'कांतारा : चाप्टर 1' हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सची विशेष चर्चा होत आहे. या क्लायमॅक्सच्या शूटिंगच्या वेळी ऋषभ शेट्टीची काय अवस्था झाली होती, त्याचे फोटो त्याने शेअर केले आहेत.

Kantara: Chapter 1: 'कांतारा: चाप्टर 1'चा क्लायमॅक्स शूट करताना अशी होती ऋषभ शेट्टीची अवस्था, नेटकऱ्यांनी जोडले हात
kantara chapter 1, rishab shetty Image Credit source: Youtube
| Updated on: Oct 13, 2025 | 2:33 PM
Share

तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटामुळे कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील एक सर्वसामान्य कलाकार ऋषभ शेट्टी देश आणि जगभरात लोकप्रिय झाला. आपल्या गावाच्या मातीतली कथा त्याने मोठ्या पडद्यावर उत्कृष्टपणे मांडली आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या चित्रपटाचा प्रीक्वेल ‘कांतारा : चाप्टर 1’ प्रदर्शित झाला. हा प्रीक्वेल पहिल्यापेक्षाही अधिक भव्यदिव्य आणि प्रभावी असल्याचं कौतुक प्रेक्षक करत आहेत. ऋषभ यामध्ये मुख्य भूमिकेत असून त्यानेच दिग्दर्शनसुद्धा केलंय. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली प्रचंड मेहनत स्क्रीनवर स्पष्ट दिसून येते. ‘कांतारा’प्रमाणेच ‘कांतारा: चाप्टर 1’चा क्लायमॅक्स विशेष चर्चेत आहे. या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना ऋषभची जी अवस्था झाली होती, त्याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

जगभरात ‘कांतारा : चाप्टर 1’ला भरभरून प्रतिसाद मिळत असताना, बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचताना ऋषभने सेटवरचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचे सुजलेले पाय पहायला मिळत आहेत. ‘क्लायमॅक्स शूटिंगची वेळ.. सुजलेले पाय, थकलेलं शरीर.. आज कोट्यवधी लोकांनी तो पाहिला आणि त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आमचा ज्या शक्तीवर विश्वास आहे, त्या शक्तीच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य झालं नसतं. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आणि आपली मतं व्यक्त केली, त्यांचे मी आभार मानतो’, असं त्याने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

ऋषभचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्याच्या मेहनतीसमोर हात जोडले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो गेल्या तीन-चार वर्षांपासून कुटुंबीयांसह त्याच्या गावीच राहत आहे. या संपूर्ण प्रवासात पत्नी प्रगतीने खूप साथ दिल्याचं त्याने वेळोवेळी म्हटलंय. ऋषभच्या पत्नीनेच चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझाइनिंगचं काम केलंय. ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 450 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...