AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता! 1500 नाही या महिन्यात 3000 रुपये खात्यात येणार?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाअखेर मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा करण्याची शक्यता आहे. काय आहे अपडेट जाणून घ्या...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता! 1500 नाही या महिन्यात 3000 रुपये खात्यात येणार?
लाडकी बहीण योजना
| Updated on: Dec 05, 2025 | 2:34 PM
Share

Ladki Bahin Yojana Ekyc Update: राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट आताच देण्याची शक्यता आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होतील. त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे जमा होतील. बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील.

नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याची प्रतिक्षा

डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. पण आतापर्यंत लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. माध्यमातील काही वृत्तानुसार, यावेळी नोव्हेंबर आणि डिसेबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार आहे. असे झाले तर लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार 3000 रुपये जमा करेल. अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा सन्माननिधी का देण्यात आलेला नाही याची चिंता लागलेली आहे.

कधीपर्यंत जमा होईल हप्ता?

लाडकी बहिणींच्या बँक खात्यात पैसे न आल्यामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असू शकते. यामुळेच बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. यापूर्वी गेल्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन महिन्यांची रक्कम जमा झाली होती. त्यावेळी महिलांना एकदाच 3,000 रुपये मिलाले होते. एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही. जर तुम्ही अजूनही E-KYC केली नसेल तर घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. अन्यथा तुमचा निधी थांबवण्यात येईल.

घर बसल्या अशी करा E-KYC

अगोदर ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा

होम पेजवरील ईकेवायसीवर क्लिक करा. आता ई-केवायसी फॉर्म उघडेल

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याला त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवावा लागेल

आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्या. ओटीपीवर क्लिक करा

आधाराला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी सबमिट करा

जर ईकेवायसी अगोदरच झाले असेल तर तसा मॅसेज येईल

जर ईकेवायसी पूर्ण झाली नसेल तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते तपासा

गेल्यावर्षी सुरू झाली लाडकी बहीण योजना

राज्य सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. महिलांना आर्थिक मदत करणे आणि पुढे कर्ज पुरवठ्याद्वारे त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचा उद्देश आहे. पात्र लाभार्थी महिलेला दरमहा 1500 रुपयांचा सन्माननिधी थेट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने या योजनेत ई‑KYC प्रक्रिया सक्तीची केली आहे.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.