AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडामोड! कॅबिनेट बैठकीत शिंदे गटाची नाराजी, थेट मुख्यमंत्र्यासमोरच…

महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत शिंदे गटाने निधी वाटपावरून मुख्यमंत्र्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर शिंदेंच्या मंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरही चर्चा अपेक्षित होती, ज्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये आधीच तणाव निर्माण झाला आहे.

मोठी घडामोड! कॅबिनेट बैठकीत शिंदे गटाची नाराजी, थेट मुख्यमंत्र्यासमोरच...
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 1:09 PM
Share

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरू आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येत आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरही चर्चा होणार आहे. पण हा विषय चर्चेला येण्यापूर्वीच दुसऱ्या विषयावरून बैठकीत ठणाठणी सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी थेट निधी वाटपाचा विषय काढून मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबतची आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

कॅबिनेट बैठकीत निधी वाटपावरून शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वित्त विभागातील काही अधिकारी मुजोरी करत असल्याची तक्रार शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरकारने दिलेल्या निधीत काटछाट करण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना कुणी दिला? असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, या मुद्द्यावरून राज्यात दोन्ही पक्षात वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑडिओ क्लिपचा मुद्दा गाजणार?

दरम्यान, कॅबिनेटच्या बैठकीत कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ही क्लिप महाराष्ट्राला ऐकवली होती. या क्लिपमध्ये गंभीर आरोप करण्यात आले होते. जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा दावा या क्लिपमधील व्यक्ती करत असल्याचं उघड झालं होतं. क्लिपमध्ये बोलणारे सर्वजण भाजपशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. ही क्लिप ऐकवल्यानंतर जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना सवाल केला होता. तुम्ही 500 कोटी घेतले का? याचं उत्तर द्या, असं आव्हानच जरांगेंनी शिंदेंना दिलं होतं. भाजप कुणाचा गेम करतंय? तुमचा की माझा? असा सवालही जरांगे यांनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी या क्लिपशी आपला संबंध नसल्याचा आणि आपण 500 कोटी रुपये घेतले नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

मात्र, त्यानंतरही हा वाद थांबला नाही. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या क्लिपवरून भाजपवर हल्ला चढवला. तर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या भाजपच्या नेत्यांनी कदम यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे कथित ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि शिंदे गटात जुंपल्याचं चित्र झालं होतं. त्याचेच पडसाद आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे मंत्री हा मुद्दा लावून धरतात की सोडून देतात हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.

Follow Us
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?
नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय....
Nagpur MLC Election 2026 Result : नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय परिणाम होणार?
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
Maharashtra MLC Election 2026 Result : एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
Shivsena : शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा....
Satej Patil : प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा विरोधकांना टोला
झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय...
MLC Election 2026 Maharashtra : आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय लिहिलंय?
25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल...
Maharashtra MLC Election 2026 Result : 25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल नेमका कधी लागणार?