व्हिटॅमिन ई कॅप्सूल करतं चेहऱ्यावर चमत्कार! कशात मिक्स करून लावणार? वाचा

| Updated on: Apr 23, 2023 | 2:33 PM

केसांसोबतच शरीराच्या इतर भागांवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणू शकतात. व्हिटॅमिन ई त्वचेशी संबंधित इतर समस्यादेखील दूर करते.

व्हिटॅमिन ई कॅप्सूल करतं चेहऱ्यावर चमत्कार! कशात मिक्स करून लावणार? वाचा
Vitamin E
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: वाढत्या प्रदूषणामुळे सध्या लोकांच्या त्वचेमध्ये झपाट्याने बदल होतायत. अनेकदा बदलत्या हवामानामुळे त्वचा खराब होते आणि आपण आजारी दिसतो. इथे एक रेसिपी आहे जी आपल्या त्वचेची चमक परत आणेल. याशिवाय केसांसोबतच शरीराच्या इतर भागांवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणू शकतात. व्हिटॅमिन ई त्वचेशी संबंधित इतर समस्यादेखील दूर करते. याशिवाय गळणाऱ्या केसांवर याचा परिणाम दिसून येतो आणि तुमचे केस काळे, लांब, दाट आणि मजबूत होतात.

पपई आणि ई कॅप्सूल फेस मास्क

पपईच्या फेस मास्कसोबत व्हिटॅमिन ई चा वापर करता येतो, या दोघांचे कॉम्बिनेशन त्वचेसाठी खूप प्रभावी ठरते. त्यांच्या वापराने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि त्वचेच्या मृत पेशी निघून जातो, आपला चेहरा चमकदार होतो.

अंडी आणि ई कॅप्सूल फेस मास्क

अंड्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून तुम्ही मास्क तयार करू शकता. हे बनवण्यासाठी दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल, एक चमचा दही आणि एक चमचा अंडी (पिवळसर भाग) घेऊन ते व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर थोडा वेळ सोडा, नंतर चेहरा नीट चोळून धुवा.

व्हिटॅमिन ई कॅप्सूल

अनेक जण थेट व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरतात, परंतु त्वचेची काळजी घेणारे तज्ञ म्हणतात की जर व्हिटॅमिन ई कॅप्सूल कोरफड जेलसह वापरले तर ते अधिक प्रभावी सिद्ध होते. कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र मिसळून चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी फेस वॉश किंवा मास्क म्हणून वापरता येतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक परत येईल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)