AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महिला नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंची चिंता वाढली

Shinde vs Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यानंतर शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात एका महिला नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महिला नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंची चिंता वाढली
Shinde vs ThackerayImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 06, 2025 | 10:45 PM
Share

आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नेत्यांनीही पक्षांतर करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांनी महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले. एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले. याच कार्यक्रमावेळी शिंदेंना उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का दिला आहे. एका महिला नेत्याने आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मंगला सुळे यांचा शिवसेनेत प्रवेश

डोंबिवलीतील शिनसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित हा पक्ष प्रवेश पार पडला. डोंबिवली पश्चिमेत माझी नगरसेवक विकास मात्रे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंगला सुळे या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याआधी भाजपच्या माझी नगरसेविका होत्या. आता त्यांनी शिवसेनेच्या साथीने जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज डोंबिवली MIDC अंतर्गत सावळाराम क्रीडा संकुलाच्या लोकार्पण आणि विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लाडकी बहीण योजना महायुती विसरणार नाही – शिंदे

या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मी जिथे जिथे सभा करतो कार्यक्रम करतो तिथे तिथे लाडक्या बहि‍णींची संध्या पहायला मिळते. ⁠लाडकी बहीण योजना महायुती विसरु शकणार नाही आणि विरोधक ही विसरु शकणार नाहीत. ⁠मी नेहमी सही करतो कारण समोरच्याला समाधान वाटावे. महायुती म्हणून मी आणि देवेंद्रजींनी खुप विकास कामे केली आहेत. आपत्ती तिथे एकनाथ शिंदे. रवींद्र चव्हाण बरोबर बोलले MMRDA चा निधी महायुतीमुळे या शहरांना मिळू लागला आहे. ⁠महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. याचा अभिमान आहे. दिलेला शब्द मी पाळणारा आहे असं त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा